शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

धम्ममेघा धम्मसंमेलन उत्साहात

By admin | Updated: January 24, 2015 00:22 IST

चिखली हमेशा, राजेगाव, एमआयडीसी, खुटसावरी मार्ग स्थित पर्यावरण स्थळी धम्ममेघा व धम्मसंमेलन उत्साहात पार पडले.

भंडारा : चिखली हमेशा, राजेगाव, एमआयडीसी, खुटसावरी मार्ग स्थित पर्यावरण स्थळी धम्ममेघा व धम्मसंमेलन उत्साहात पार पडले.पहिल्या सत्रात प्राचार्य गजेंद्र गजभिये यांच्या नेतृत्वात अ‍ॅड. एकनाथ रामटेके, असीम शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत, केशव रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. धम्मरॅली काढण्यात येवून बँड पथकाच्या ध्वनीत मानवंदना देण्यात आली.द्वितीय सत्रात भदंत सत्यशील महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली चुन्नीलाल वासनिक यांनी धम्मदान केलेल्या सांची प्रवेशव्दाराचे उद्घाटन इंजि. जितेंद्र उके, कारण उके यांनी, स्मृतिशेष गीता पंचभाई यांच्या स्मरणार्थ धम्मदान केलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृति प्रतिमेचे उद्घाटन डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या ११० व्या जयंती दिनी, एम.डी. तिरपुडे भंडारा यांनी धम्मदान केलेल्या शेडचे विधिवत उद्घाटन, भिक्षु संघाच्या उपस्थितीत आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. धम्म परिषदेला मंचावर भदंत संघरत्न मानके, डॉ. भदन्त अनिरूद्ध महाथेरो, भदंत बनकली, भदंत नागदिपंकर, भिक्षु धम्मरत्न, भदंत संघघात, भदंत थेरो, भिक्षुणी संघप्रिया यांनी हजेरी लावली. प्रास्ताविक भदंत धम्मदिप यांनी केले.स्मृतिशेष डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या ११० व्या जयंती प्रित्यर्थ डॉ. भदन्त ज्ञानरत्न श्रामणरे शिलरतन प्रा. डॉ. हरभजनसिंह हंसपाल, के.डी. रामटेके, अनिल शिवचरण चौरे, बिंदराज डोंगरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुमेध उके, प्रा. सुरेश खोब्रागडे यांचा विशेष योगदानाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. भदन्त सदानंद महाथेरो संघानुशाक यात्रा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. प्रा. वासंती सरदार, मदनलाल गोस्वामी, इ.मो. नारनवरे उपस्थित होते. अ‍ॅड. एकनाथ रामटेके यांनी धर्मांतरीत २२ प्रतिज्ञा दिल्या. सत्यशिल महाथेरो यांनी अध्यक्षीय भाषण केले. संचालन प्रा. पुरण लोणारे तर आभार प्रदर्शन एच.डी. उके यांनी मानले. तृतीय सत्रात समाजप्रबोधनकार सप्तखंजेरीवादक तुषार सुर्यवंशी यांचे बहारदार किर्तन होवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमासाठी सुष्मा वासनिक, चांगुना कांबळे, केशव खोब्रागडे, पौर्णिमा टेंभूर्णे, लता उके, ज्योती मेश्राम, शिला साखरे, रचना वैद्य, कुंता बारसागडे, चित्रलेखा मेश्राम आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)