शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खेळांमुळेच विद्यार्थ्यांचा विकास

By admin | Updated: January 27, 2015 23:29 IST

पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण महत्वाचे असते. खेळामुळेच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. यामुळे स्नेहसंमेलनाच्या जोडीला क्रीडा संमेलनाची आवश्यकता असते,

भंडारा : पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण महत्वाचे असते. खेळामुळेच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. यामुळे स्नेहसंमेलनाच्या जोडीला क्रीडा संमेलनाची आवश्यकता असते, असे प्रतिपादन स्कुल आॅफ स्कॉलर्सच्या प्राचार्या शिखा भट्टाचार्जी यांनी आयोजित शाळेच्या वार्षिक क्रीडासम्मेलन प्रसंगी केले.क्रीडा संमेलनाला उद्घाटक पाहुणे म्हणून आमदार चरण वाघमारे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मेघे ग्रुपच्या व्ही.टी. कॉन्व्हेंट नागपूरच्या प्राचार्या सुरेखा कोठे, विशाल चव्हाण व स्कूल आॅफ स्कॉलर्स भंडाऱ्याच्या प्राचार्या शिखा भट्टाचार्जी या उपस्थित होत्या. क्रीडा संमेलनाची सुरुवात ही केशव नगरपासून शाळेपर्यंत मशाल रॅली काढून करण्यात आली. मशाल रॅली ही शाळेतील राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळून आलेल्या विद्यार्थ्यांकडून काढण्यात आली. या रॅलीचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयीचा उत्साह जागृत करणे हा होता. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे विविधारंगी कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. आ.चरण वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयीचा नवा जोश भरला. क्रीडा संमेलनासाठी शाळेतर्फे थिम म्हणून चॅम्पियन हा विषय ठेवण्यात आला होता. यात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या खेळाविषयीची माहिती नृत्याद्वारे प्रदर्शित केली. सोबतच नृत्यांच्या माध्यमातून योगासने, कसरती अशा इतर शरीर कौशल्याचेही उत्कृष्टरीत्या सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात पुढे नियोजित इतर खेळांच्या अंतिम सामन्यांना सुरुवात करण्यात आली. सकाळी पूर्व प्राथमिक गटाचे, प्राथमिक व माध्यमिक गटाचे सामने घेण्यात आले. बक्षीस वितरणाला पाहुणे म्हणून भाजपचे संघटन महामंत्री महम्मद तारीक कुरैशी, सामाजिक कार्यकर्ते एस.के. बांते, क्रीडा अधिकारी ए.जी. मरस्कोल्हे, उईके, विकास मदनकर हे उपस्थित होते. संचालन विद्यार्थ्यांनी केले. यात गरीमा हिवरकर, लोकेश पंचबुद्धे, कौस्तुभ उमाळकर, नचिकेत टेंभूर्णीकर, स्वीटी बांते, हर्ष रहांगडाले हे होत. आभार प्रदर्शन शिक्षिका रश्मी नागपुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक गण यांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)