शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक आंबागड किल्ल्याचा विकास कागदावरच

By admin | Updated: December 5, 2015 00:42 IST

तुमसर तालुक्यातील एकमेव ऐतिहासिक आंबागड किल्ला हा शासनाच्या दुर्लक्षितपणाचे शिकार ठरला आहे.

पुरातत्त्व व पर्यटन विभागाची उदासीनता : तुमसर क्षेत्रातील ऐतिहासिक माहात्म्यतुमसर : तुमसर तालुक्यातील एकमेव ऐतिहासिक आंबागड किल्ला हा शासनाच्या दुर्लक्षितपणाचे शिकार ठरला आहे. या किल्यापर्यंत जाण्याकरीता पक्का रस्ता नाही. केवळ शासनाने थातूरमातूर निधी देऊन दुर्लक्षित किल्ल्याकडे लक्ष देण्याचे ठरविल्याचे दिसते. पुरातत्व व पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी येथे येवून केवळ कागदोपत्री अहवाल शासनाला सादर करतात. प्रत्यक्षात येथे त्याचा प्रत्यय येत नाही.भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाद्वारे गेल्या काही दशकात झालेल्या पुरातत्वीय अन्वेषण आणि उत्खननामुळे विदर्भातील एकुणच संस्कृतीच्या संदर्भात आजपर्यंत इतिहासाला ज्ञात नसलेल्या अनेक बाबी गेल्या काही दशकात स्पष्ट झाल्या आहेत. महापाषाण संस्कृतीबद्दल अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुरावे उपलब्ध झाले आहेत. या भागात मूळ कोणत्या लोकांची वस्ती होती, हा प्रश्न अजूनपर्यंत पूर्णपणे सुटलेला नाही. या भागात प्राचीन काळी नागा लोकांची वस्ती होती. त्यानंतर गवळी लोकांची वस्ती आणि लहान, लहान राज्ये असल्याचे पुरावे उपलब्ध होतात. युरोप प्रमाणे प्राचीन भारताचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. विदर्भाच्या इतिहासाविषयी तीच परिस्थिती आहे. नाणी, ताम्रपट, शिलालेख, वास्तूअवशेष, नाटके, पुराणे, दंतकथा, यावरून तुटक तुटक धागे वारंवार तपासून इतिहास तयार करावा लागतो. ज्ञात ऐतिहासिक राजवंशापैकी नंद, मौर्य, शुंग, मित्र, भद्र, सातवाहन, शक, वाकाटक, नलवंश्ीा, महिस्पती, कलचुरी, राष्ट्रकुट, परमार, चालुक्य यादव, गोंड, मुगल, भोसले इ. राज्यकर्त्यांनी या प्रदेशावर राज्य केल्याचे विविध ऐतिहासिक पुराव्यांवरून व उत्खननात सापडलेल्या वस्तूंवरून ही बाब स्पष्ट होते. प्राचीन मंदिरेहा एक मंदिरांचा समुच्चय असलेला डोंगर आहे. गडावरील प्राचीन मूर्ती या नुसत्या मूर्ती नसून त्या काळचे प्रतिनिधीक अंग आहेत. देवदेवतांच्या विषयी कोणत्या कल्पना होत्या याची माहिती मिळते. उत्तर भारतात गुप्त राजवटीत पुराणांची रचना झाली. त्यात दशअवतारांची कल्पना मांडण्यात आली. त्याचे प्रतिसाद या डोंगरावर उमटल्याचे दिसते. उत्तर भारतीय गुप्तकलेचा प्रभाव जाणवतो. इ.स.वी. सनाच्या चौथ्या शतकात उभारण्यात आलेल्या या वास्तू तत्कालीन मथुरा शैलीची साक्ष देतात. वराह मूर्ती वाकाटक शिल्पींची एक श्रेष्ठ कलाकृती आहे. ती बेसॉल्टच्या दगडात खोदलेली असून नितळ कोरव अवयवांद्वारे तीचे एैश्वर्य दिसून येते. नरसिंहाचे स्वरुप वाकाटकांच्या राज्यात खूपच लोकप्रिय दिसते. माडगी येथील वैनगंगेच्या (कण्हेवेण्णा) पात्रातील नरसिंह मूर्ती कदाचित त्याच काळातील असावी. केवलनरसिंह मंदिर येथे १५ ओळींचा प्रभावती गुप्तचा प्रशस्तीलेख आहे. गुप्तराम, त्रिविक्रम (वामन) मंदिर, भोगराम इत्यादी प्राचीन मंदिर आहेत.बख्त बुलंद शहाएकंदरीत गोंड राजांचा विचार केल्यास बख्तबुलंद सारखा दुसरा प्रभावी गोंडराजा नसल्याचे स्पष्ट होते. बख्तबुलंद धडाडीचा योद्धा होता. तथापि परिस्थितीने त्याला साथ दिली नाही. युद्धग्रस्त व अर्थपिडीत राज्याचा त्याला वारसा मिळाला होता. परंतु एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्याने जे निर्णय घेतले, त्याला गोंड राजवटीत तोड नाही. मिळालेल्या अल्पशा अवधीत त्याने भरपूर राज्यविस्तार करून छिंदवाडा, बैतूल, नागपूर, शिवणी, भंडारा आणि बालाघाटचा परिसर आपल्या राज्यात समाविष्ठ केला. अनेक प्रशासकीय व महसूल विषयक सुधारणा अमलात आणल्या. यासाठी त्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची संबंधित पदावर नियुक्ती केली. नागपूर शहराचा विस्तार करुन त्याला राजधानीचा दर्जा दिला व तेथूनच तो कारभार करू लागला. बख्तबुलंदने शिवणी येथील गव्हर्नर राजखान पठाण यांच्याकडून आंबागड किल्ला १७०० मध्ये बांधून घेतला. आंबागड प्रदेश झाडीमंडल म्हणून ओळखल्या जात असे. या भागात घनदाट जंगल होते. वेगवेगळ्या प्रदशातून कुशल कारागीर आणून कृषी, उद्योग व व्यापार यांचा पाया घातला. या भागाचा विशेषत्वाने विकास करण्याचे प्राथमिक क्षेत्र बख्तबुलंद यास द्यावे लागते. सानगडी, प्रतापगड, किल्ले त्याच्या राज्यात मोडत होते. बख्तबुलंद नंतर चांदसुलतानने इ.स. १७३८ पर्यंत राज्य केले. चांदपूर देवस्थान हे गाव त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. तिथे पूर्वी किल्ला असल्याचे ऐकीवात आहे. चांदसुलतानच्या मृत्यूनंतर गोंड वारस युद्धाचा फायदा घेवून रघुजी भोसलेंनी इ.स. १७३६ मध्ये पाटणसावंगी, पवनी, सोनबरडी आदी गोंडाची ठिकाणे सर करून आंबागड, देवगड, सानगडी, प्रतापगड, नागपूर ही गोंड राज्ये ताब्यात घेतली. रघुजी भोसलेल्या अधिपत्त्याखाली कुणबी व पोवार या समाजाने सैनिकी पेशा स्वीकारला व भोसले बरोबर कंटकच्या मोहीमेत भाग घेतला. त्याबद्दल भोसलेंनी वैनगंगा खोऱ्यातील सुपीक जमीन इनाम म्हणून देऊन त्यांचा गौरव केला.आंबागड किल्लाइतिहासाची साक्ष देणारा आंबागड किल्ला सातपुडा पर्वतरांगेत मोडत असून या भागातील लष्करी महत्व लक्षात घेऊन बख्तबुलंदने शिवणी येथील गव्हर्नर राजाखान पठाण यांच्या हस्ते इ.स. १७०० मध्ये बांधून घेतला. किल्ला मूळ स्वरपात नसला तरी अवशेष स्वरुपात शिल्लक आहे. आंबागड किल्ल्याच्या इतिहासाची साधने फारसी उपलब्ध नाहीत. तसेच त्याचा अधिकृत असा इतिहास उपलब्ध नाही. किल्ल्याची उत्तर दक्षिण दिशा सुरक्षित असून पूर्व पश्चिमेकडे तटबंदी केलेली आहे. किल्ल्याच्या बांधणीसाठी वालुकाश्म दगडाचा व विटांचा वापर करण्यात आला. हा किल्ला दोन भागात विभागलेला असून पूर्वी किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर गोंडी राजचिन्ह होते. पांडे महाल भंडारा येथे महालाकरिता वापरलेला दरवाजा आंबागड किल्ल्याचा आहे. येथे अनेक बुरूज असून प्रत्येक बुरूजावर एक तोफ ठेवण्याची सोय आहे. भोसले काळात तुरुंग म्हणून या किल्ल्याचा वापर होत असे. ब्रिटीश काळापर्यंत आंबागड हा स्वतंत्र परगणा असून प्रशासकीय केंद्र होते. (तालुका प्रतिनिधी)