शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन व्हॅली चांदपूर स्थळाचा विकास महाराष्ट्र पर्यटन विभाग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:05 IST

ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात दोन कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे. ही विकास कामे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियंत्रणात केली जात आहे. यामुळे पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरूवात केली आहे. पर्यटनस्थळाचे विकासाने रोजगाराचे संधी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाला पाच कोटीचा प्रस्ताव सादर : पर्यटनस्थळात दोन कोटीचे कामे सुरू

रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात दोन कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे. ही विकास कामे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियंत्रणात केली जात आहे. यामुळे पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरूवात केली आहे. पर्यटनस्थळाचे विकासाने रोजगाराचे संधी उपलब्ध होणार आहे.भंडारा जिल्ह्यात राज्य शासनाने मंजुरी दिलेला सिहोरा परिसरातील एकमेव ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनस्थळाला सन २००० मध्ये मंजुरी व कंत्राट पद्धतीवर विकसित करण्यात आले आहे. परंतु आॅगस्ट सन २०१२ पासून या पर्यटन स्थळाची लीज संपताच कंत्राटदाराने ताबा सोडला आहे. यानंतर पर्यटन स्थळाचा नव्याने विकास करण्यासाठी राज्य शासनाने नवीन टेंडरची प्रक्रिया राबविली नाही. सहा वर्ष पर्यटन स्थळाने कटूसत्य अनुभवले आहे. पाटबंधारे विभागाचे नियंत्रणात असणाऱ्या या पर्यटनस्थळाचे नाव राज्य आणि अन्य राज्याच्या कानाकोपºयात पोहचले आहे. यामुळे पर्यटनस्थळ बंद असताना पर्यटकांनी या पर्यटन स्थळात सातत्याने हजेरी लावली आहे. या कालावधीत इको टुरिजम अंतर्गत पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी १२ कोटी खर्चाचा प्रस्ताव वन विभागाने सादर केला आहे. परंतु या प्रस्तावाला अद्याप पर्यंत मंजुरी मिळाली नाही. यामुळे पर्यटन स्थळात विकासाला 'ब्रेक' मिळत असल्याने नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचा विषय चर्चेत ठेवण्यात आला होता. या पर्यटन स्थळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे यंत्रणेने सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला असता निधी अभावी विकास कामांना गती देण्यात आली नाही. या पर्यटन स्थळात असणाºया ब्रिटीशकालीन विश्रामगृहाची नासधुस करण्यात आली आहे. या विश्रामगृहाचे जागेत नवीन विश्रामगृह बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. आमदार चरण वाघमारे यांनी पर्यटन स्थळात विश्रामगृहाचे बांधकाम करिता १ कोटी ८४ लाख रूपयांचा निधी खेचून आणला आहे. विश्रामगृहाचे बांधकामाला गती देण्यात आली आहे. यामुळे ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाने विकासात कात टाकण्यास सुरूवात केली आहे. परंतु विश्रामगृह बांधकामशिवाय अन्य विकास कामांना सुरूवात व मंजुरी देण्यात आली नाही. चांदपूर जलाशय तथा लगतचे जागेत, पाणी टाकीत रामझुला, बोटींग, कौटेक, भुलभुलैया तथा जंगलाचे भ्रमण आदी पर्यटन स्थळाचे विकास कार्यात असणारे कार्य अद्याप सुरू करण्यात आले नाही. यामुळे फक्त विश्रामगृह बांधकामाने पर्यटन स्थळाचा विकास होणार नाही, असा परिसरात चर्चा सुरू आहे.पर्यटनस्थळाचे विकास संदर्भात अनेक चर्चा असताना पर्यटन स्थळातील जलाशयात बोटींग व अन्य सुविधाचे विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने पाच कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात वनविभाग ऐवजी आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियंत्रणात पर्यटन स्थळाचा विकास साधण्यात येणार आहे. पर्यटन स्थळाचा जलद गतीने विकास करण्याची मागणी आहे.देवस्थानचा विकास उपेक्षितचांदपूरात पर्यटन स्थळ आणि जागृत हनुमान देवस्थान आहे. याशिवाय चांद सॉ वली दरगाह, ऋषीमुनी आश्रम, किल्ल्याची भिंत आदी आहे. पर्यटनस्थळाचा विकास करताना या देवस्थानच्या विकास कार्यासाठी स्वतंत्र पॅकेज मंजुर करण्याची गरज आहे. यामुळे चांदपूर गावाला वैभव प्राप्त होणार आहे. पर्यटन आणि भाविकांची रेलचेल वाढणार असल्याने गावातच रोजगाराची संधी बेरोजगारांना उपलब्ध होईल.चांदपूर पर्यटन स्थळात विश्रामगृहाच्या बांधकामाकरिता १ कोटी ८४ लाख रूपये मंजुर झाले आहेत. अन्य विकास कामे करण्यासाठी ५ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून येत्या काही महिन्यात निधी मंजुरी नंतर विकास कामांना सुरूवात होईल. पर्यटनस्थळाच्या विकासाने रोजगाराचे संधी उपलब्ध होतील.-चरण वाघमारे, आमदार, तुमसर व मोहाडी विधानसभा क्षेत्रइको टुरिझम अंतर्गत पर्यटन स्थळात विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. परंतु या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही.-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्रधिकारी, तुमसर.