शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्यातील धानपीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:33 IST

हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेने शेतात रोवणी केलेल्या धानावर एका पाण्याने अक्षरश: पाणी फेरले. संपूर्ण साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आणि अपुºया सिंचन व्यवस्थेने साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी देशोधडीला : अपुऱ्या सिंचन व्यवस्थेचा बसतोय फटका

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेने शेतात रोवणी केलेल्या धानावर एका पाण्याने अक्षरश: पाणी फेरले. संपूर्ण साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आणि अपुऱ्या सिंचन व्यवस्थेने साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. आता शेतकºयांना दुष्काळ घोषित होण्याची आणि मदतीची अपेक्षा आहे.साकोली हा प्रमुख भात उत्पादक तालुका होय. पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली. दमदार पावसाने पºहे उगवले. शेतकºयांची आशा उंचावली. प्रचंड मेहनत करून पºह्यांची रोवणी करण्यात आली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. मात्र आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धानपीक शेतात बहरू लागले. मात्र शेतकऱ्याचा हा आनंद काही काळच टिकला. पावसाने दडी मारली ती कायमची. दसरा गेला तरी पावसाचा पत्ता नाही. शेतातील धान पाण्याअभावी करपू लागले. सिंचनाची सुविधा असतानाही प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने ओलीत करणे शक्य झाले नाही. भारनियमनाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. अशा स्थितीत पीक वाचविताना शेतकरी उध्वस्त झाला. आता हलका धान काढणीला आला आहे. मात्र अपेक्षित उत्पन्न होत नसल्याचे दिसत आहे. उच्च प्रतीच्या धानावर किडींनी आक्रमण केले आहे. महागडे बियाणे फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.साकोली केंद्रावर २४८ क्विंटल धान खरेदीसाकोली येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी या धान खरेदी केंद्रावर २४८ क्विंटल धानाची खरेदी झाली. यावरूनच तालुक्यात दुष्काळस्थिती किती भीषण आहे याची कल्पना येते. शासनाने दुष्काळ घोषित करावा अशी मागणी आता तालुक्यातून होत आहे.