शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदाराने सिनेस्टाईल रेतीचा ट्रॅक्टर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST

ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६-२१३२ आहे. तहसीलदारांनी पकडलेला ट्रॅक्टर बारव्हा येथील लाडे नामक व्यक्तीच्या नावे असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. मागील ...

ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६-२१३२ आहे. तहसीलदारांनी पकडलेला ट्रॅक्टर बारव्हा येथील लाडे नामक व्यक्तीच्या नावे असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. मागील कित्येक दिवसांपासून बारव्हा परिसरातील मरेगाव, खोलमारा, तई, मरिमाय घाट, धर्मापुरी, बोथली व अन्य ठिकाणांवरून गौण खनिजांची रेती तस्करांकडून लयलूट सुरू आहे. हा खुलेआम चालणारा रेती तस्करीचा गोरखधंदा पोलीस विभाग व स्थानिक महसूल कर्मचारी यांचेच पाठबळाने सुरू असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. दिवसाढवळ्या खुलेआम रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. लाखांदूर येथील नायब तहसीलदार देवीदास पाथोडे यांनी दखल घेत रेतीचे ट्रॅक्टर पकडण्याची शक्कल लढविली. स्वतः पाथोडे हे ट्रॅक्टर मालकांच्या एजंटांचा डोळा चुकवित आडमार्गाने जाऊन खोलमारा मरेगाव रस्त्यावरील तलावाच्या पाळीवर दबा धरून बसले. इतक्यात सुसाट वेगाने रेती भरून धावत येत असलेल्या ट्रॅक्टरला अडवून ट्रॅक्टर थांबवत हायड्रोलिकचे पाईप त्वरित काढले. ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर अडविल्याची माहिती मिळताच लगबगीने येत ट्रॅक्टरचा ताबा मिळवित रेतीचा ट्रॅक्टर दामटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान बाळगत तहसीलदार पाथोडे यांनी पुन्हा ट्रॅक्टरचा ताबा घेत पोलिसांना बोलाविले. ट्रॅक्टरवर स्वतः बसून रेतीचा ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केला.

बॉक्स

रेतीच्या चोरट्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवायचे आहे. पैसे घेऊन ट्रॅक्टर सोडण्यात येतात या नुसत्या पोकळ चर्चा आहेत. यापुढे ही असेच ट्रॅक्टर पकडून कारवाई करीत शासकीय मालमत्तेची लयलूट होऊ देण्यात येणार नाही.

देवीदास पाथोडे

नायब तहसीलदार लाखांदूर