व्यथा मुंढरीवासीयांची : पुराच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसानकरडी (पालोरा) : मुंढरी खुर्द ग्रामवासीयंना नेहमी वैनगंगा नदीच्या पुराने चटके सहन करावे लागतात. पुरापासून गावाचा बचाव होण्यासाठी वैनगंगा काठावरून गाव संरक्षण भिंत उभारण्यात या संबंधीच्या मागणीचे निवेदन सरपंच गौरीशंकर नेरकर यांच्या हस्ते प्रशासनाला देण्यात आले.मुंढरी (खुर्द) गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. वैनगंगा नदीमुळे संपूर्ण परिसर मोहाडी तालुक्यापासून वेगळा असून तुमसर शहराला वळसा घालून नागरिकांना समस्या घेऊन तालुक्याच्या ठिकाणी पोहचावे लागते. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रा सहन करावा लागतो. पूर परिस्निथतीतही वेळेवर मदत प्रशासनाकडून मिळत नसल्याने नागरिकांचे जीवन मरणाचे प्रश्न निर्माण होतात. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे तर चऱ्याचवेळा धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडल्याने पुराचे पाणी गावात शिरुन गावाला बेटाचे स्वरुप प्राप्त होते. गावकऱ्यांना गावाबाहेर निघणे कठीण होते. शेतीचे अतोनात नुकसान तर होतेच शिवाय अन्न व निवाऱ्याची समस्या प्रकर्षाने पुढे येते. वारंवारच्या पुरपरिस्थितीमुळे दरवर्षी नदीचा काठ रुंदावत असल्याने काठावरील घरे नदीत गिळंकृत होऊ पाहत आहेत. नदीकाठावर वसलेले २० ते २५ कुटुंबाचा गावापासून संपर्क तुटतो. सदर कुटुंबापर्यंत पोहचण्याचा दुसरा मार्ग नसल्याने घरांना धोका उद्भवण्याबरोबर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुंढरी खुर्द गावाची बिकट समस्या लक्षात घेता गाव संरक्षण भिंतीचे बांधकाम लवकरात लवकर मंजूर होऊन बांधकाम होण्याची आवश्यकता आहे. (वार्ताहर)
भिंतीच्या बांधकामाची मागणी
By admin | Updated: July 29, 2014 23:40 IST