शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना कर्जमाफी देण्याची मागणी

By admin | Updated: January 30, 2016 00:54 IST

तालुक्यातील धोप व ताडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक झाले नसून या दोन्ही गावांची पैसेवारी २९ पैसे निघाली ...

तहसीलदारांना निवेदन : धोप, ताडगावासीयांची मागणीमोहाडी : तालुक्यातील धोप व ताडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक झाले नसून या दोन्ही गावांची पैसेवारी २९ पैसे निघाली असल्याने येथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच सोरणा तलावात बावनथडी प्रकल्पाचा पाणी सोडण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत धोप व ग्रामवासी यांनी तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.धोप व ताडगाव जवळील सोरणा तलावात फक्त २० टक्के जलसाठा उपलब्ध होता. पाऊस न आल्यामुळे तसेच तलावात पाणी नसल्याने या दोन्ही गावातील शेतकऱ्यावंर नापिकीची पाळी आली. तसेच ज्यांचे थोडेफार पिक झाले होते त्यांचा किडीच्या प्रादुर्भावाने पूर्ण तनसीत रूपांतर झाले. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणाद्वारे या दोन्ही गावांची आणेवारी २० पैसे काढण्यात आली असून या दोन्ही गावांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पुर्ण कर्जमाफी देण्यात यावी, वीज बिल माफ करण्यात यावे, नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच अशी परिस्थिती पुन्हा शेतकऱ्यावर येवू नये, यासाठी बावनथडी प्रकल्पाचा एक कालवा सोरणा तलावात जोडण्यात यावा व सोरणा तलावाची साठवण क्षमता वृद्धी करावी अशा मागण्या करण्यात आल्या असून मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून रास्ता रोको करण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना सरपंच मंगला पिकलमुंडे, कृष्णा पिंगरे, वर्षा नागलवाडे, केवलचंद कांबळे, नरेंद्र पिकलमुंडे, किरण अतकरी, प्रभु मोहतुरे, अरुण तितीरमारे, श्याम कांबळे, केशव बांते, चंगेज खान, दिलीप ढोसरे, गणेश पाटील, केवल कांबळे, निलकंठ गिरीपुंजे, राजेश शेंडे, संजय पाटील, रवि सपाटे, मणिराम निमकर, पुरूषोत्तम शेंडे, उरकुडा राखडे, गुड्डू बांते, संतोष उके, दुर्गा सपाटे, शारदा भोयर आदी गावकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)