शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी येथील बायपास रोडचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

ब्रह्मपुरी आगाराने ब्रह्मपुरी-वडसा-वडेगाव-केशोरी या मार्गांनी बससेवा सुरू केली आहे. तसेच नागपूरवरूनसुद्धा ट्रॅव्हल्स अर्जुनी मोरगाव व केशोरी याठिकाणी येत असते. ...

ब्रह्मपुरी आगाराने ब्रह्मपुरी-वडसा-वडेगाव-केशोरी या मार्गांनी बससेवा सुरू केली आहे. तसेच नागपूरवरूनसुद्धा ट्रॅव्हल्स अर्जुनी मोरगाव व केशोरी याठिकाणी येत असते. ही सर्व वाहने गावाच्या मुख्य रस्त्याने जात असतात. त्यामुळे खूपच त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीच हा मुख्य रस्ता अरुंद असल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. दहा वर्षांपूर्वी या परिसरातील आणि केशोरी येथील नागरिकांनी केशोरीला बायपास रस्त्याची मागणी शासनाकडे केली होती. प्रकाश पाटील गहाणे बांधकाम सभापती असताना त्यांनी या कामाला गती आणली होती. ज्या ठिकाणातील बायपास रोड जात आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून त्याविषयी त्यांना मार्गदर्शन केले. जवळपास दोन हेक्टर नव्वद डिसमिलएवढी जमीन शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जात आहे. शेतकरी जागा देण्यासाठी तयार आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी शासनाने २७ लाख रुपये मंजूर केले आहेत. परंतु, हे पैसे पुन्हा शासनाकडे परत गेले आहेत. वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी योगेश नाकाडे यांनी केली आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांशी केली चर्चा

आ. चंद्रिकापुरे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसाठी चर्चा करण्यासाठी केशोरी येथे पाठविले. यावेळी माजी बांधकाम सभापती प्रकाश पाटील-गहाणे, सरपंच नंदकुमार पाटील-गहाणे, माजी उपसरपंच हिरालाल शेंडे, तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष योगेश नाकाडे, अनिल लाडे, विजय गहाणे, अरुण मस्के व ज्या शेतकऱ्यांची जमीन या बायपास रोडमध्ये जात आहे ते सर्व शेतकरी बैठकीला उपस्थित होते. त्यांनी बायपास रोडबाबत त्यांच्याशी चर्चा केली.