शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांच्या आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

कोंढा-कोसरा : ' ब्रेक द चेन ' अंतर्गत राज्यसरकारने सर्वत्र संचारबंदी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची व शेती ...

कोंढा-कोसरा : ' ब्रेक द चेन ' अंतर्गत राज्यसरकारने सर्वत्र संचारबंदी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची व शेती व्यवसायाशी संबंधित काम करणारे बारा बलुतेदार हे कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. दररोज कामे करून उदरनिर्वाह करणारे बारा बलुतेदार यांच्यावर आज संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे बारा बलुतेदारातील लोहार, चांभार, धोबी, न्हावी, सुतार, कुंभार, सोनार, गवळी, गुरव, चांभार, बेलदार, मातंग यांच्यावर रोजगाराचे मोठे संकट उभे झाले आहे. अठरा अलुतेदार असलेले कासार, गोंधळी, कोरव, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, जोशी, भाट, जंगम, शिंपी, सनगर, साळी, वाजंत्री आणि मुस्लीम समाजातील बारा बलुतेदार आत्तार, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन, मिसगर आणि घोड्याची नाल बनविणारे शिकलगार यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी या बलुतेदार व अलुतेदारांकडे वतने होती. आता ती नष्ट झाल्याने काम केल्याशिवाय यांच्या घरी चुली पेटत नाहीत. यातही अनेकजण भटके जीवन जगतात तर काही जातीचे लोक रस्त्याच्या कडेला आपली दुकाने मांडून कामे करीत आहेत. औद्योगिक प्रगती झाल्याने अनेकांचे कामधंदे बंद पडले. सध्या हया सर्व जाती अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय जातीत त्यांचा समावेश आहे. सद्य परिस्थितीत बलुतेदारांचे धंदे बंद पडले आहेत. मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये देखील यांना मोठ्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. परंतु सरकारने एक रुपयाही मदत केली नाही. यावेळी देखील १५ एप्रिलला संचारबंदी लागू केल्याने अनेकांची रोजीरोटी बुडाली आहे. बलुतेदार मधील अनेक जातीची गंभीर परिस्थिती आहे.

लोहार, चांभार, न्हावी, धोबी, कुंभार ,मातंग समाजाची सध्या पूर्ण धंदे बंद पडल्याने उपासमार सुरू झाली आहे. १८ अलुतेदार असलेल्या व भटके जीवन जगणारे गोंधळी, गोसावी, भाट, वाजंत्री, भोई (धिवर) यांची देखील जगणे मुश्किल झाले आहे. तसेच मुस्लिम समाजातील शिकलगार, छप्परबंद, पिंजारी, फकीर, मदारी यांची अवस्थाही बिकट झाली आहे. तेव्हा महाविकास आघाडी सरकारने अनेक व्यावसायीकांना संचारबंदीच्या काळात मदतीचा हात दिला तसाच बलुतेदार व अलुतेदारांनाही आर्थिक मदतीची मागणी जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जिल्हा लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. चरणदास बावने व बेलदार संघटनेचे राजेश यलशेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे.