शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्याची मागणी

By admin | Updated: May 16, 2016 00:32 IST

प्रभाग क्र. ३ मध्ये असलेले रघुनाथ पिपरे ते प्रभू रुखने यांच्या घरापर्यंतच्या अतिक्रमणामुळे खा. प्रफुल पटेल यांच्या निधीतील विकास कामाला अडथळे येत असल्यामुळे....

पवनीतील प्रकार : पत्रपरिषदेत दिली माहितीपवनी : प्रभाग क्र. ३ मध्ये असलेले रघुनाथ पिपरे ते प्रभू रुखने यांच्या घरापर्यंतच्या अतिक्रमणामुळे खा. प्रफुल पटेल यांच्या निधीतील विकास कामाला अडथळे येत असल्यामुळे हे अतिक्रमण त्वरीत काढण्याची मागणी करून व वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन मुख्याधिकारी न.प. पवनी यांना दिल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे पवनी शहर अध्यक्ष सोनू कोरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेत पुढे सोनू कोरेकर यांनी सांगितले की खा.प्रफुल पटेल यांच्या २०१५ - १६ मधील विकास कामाच्या निधी अंतर्गत रामपुरी वॉर्ड येथील प्रभू रुखने ते रघुनाथ पिपरे यांच्या घरापर्यंतचा सिमेंट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी लेआऊट घेण्याकरिता साबांविचे कर्मचारी मोक्यावर गेले असता या रस्त्यावरील जागेवर अतिक्रमण असल्यामुळे हे अतिक्रमण काढल्यानंतरच काम सुरु करावे अन्यथा हे काम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे काम सुरु झाले नाही.या संबंधाने साबांवि ने पत्र क्र. १६९ दि.१६ एप्रिल २०१६ ला पवनी नगर पालिकेला पत्र देवून या रस्त्यावर अतिक्रमण आहे का? याची शहानिशा करून जागा मोकळी करून द्यावी. त्यामुळे रस्त्याचे काम करणे सोईचे होईल असे कळविले आहे. पण न.प. पवनी ने अजूनपर्यंत कारवाई केली नाही. त्यामुळे हे अतिक्रमण त्वरीत हटवावे अन्यथा वॉर्डातील नागरिक व भाजयुमो पवनी शहर आंदोलन करेल अशी माहिती भाजयुमोचे शहर अध्यक्ष सोनू कोरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेत सोनू कोरेकर, प्रभाकर रुखणे, राजेश रुखणे, लंकेश धकाते, प्रभू रुखणे, प्रशांत देवीकर, लालचंद देशमुख, देवीकर, योगेश निखारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)