शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावरील अतिक्रमण हटवा

By admin | Updated: September 30, 2016 00:43 IST

कोंढा कोसरा मेनरोडवर नेहमी अपघात होत असतात. याला मुख्य कारण येथे वाढलेले अतिक्रमण आहे.

कोंढा येथे अपघातानंतरचे पडसाद : नागरिकांचे तहसीलदारांना निवेदनकोंढा (कोसरा) : कोंढा कोसरा मेनरोडवर नेहमी अपघात होत असतात. याला मुख्य कारण येथे वाढलेले अतिक्रमण आहे. राज्य मार्गाच्या दोन्ही बाजुला व्यापारी, दुकानदार यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच लहानमोठे हातठेलेवाले दिवसभर दुकान थाटून बसतात. त्यामुळे ते अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.२८ सप्टेंबरला बोलेरू मिनीडोर गाडीने स्वाती केवळराम मैदळकर या मुलील चिरडले त्यामुळे तिचा मृत्यू झाला. गांधी ज्युनिअर कॉलेजचे सकाळपाळीचे वर्ग ११.३० वाजता सुटतात. त्यावेळी मेनरोडवर प्रचंड गर्दी असते. तसेच दररोज दुपारी ५ वाजता देखिल वर्ग ५ ते १० चे वर्ग सुटल्यानंतर मेनरोडवर प्रचंड गर्दी असते. अशावेळी कोंढा येथे नेहमीसाठी वाहतूक पोलीस मेनरोडवर राहणे आवश्यक आहे.राज्यमार्गावर बसस्टँडपासून बेलाटी रोडपर्यंत आजुबाजुला लहान मोठ्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. वाहनधारक देखिल आजुबाजुला वाहन उभे ठेवून इकडे तिकडे भटकत असतात. तसेच खरेदीदार दुकानाच्या समोर मोटारसायकल, सायकल उभी करून सामान खरेदी करीत असतात म्हणून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे अपघताचे प्रमाण वाढले आहे. आठवडी बाजाराच्या दिवसी लोकांची प्रचंड वर्दळ येथे असते. अशावेळी दिवसभर एक पोलीस कर्मचारी येथे असणे आवश्यक आहे. पण तो कर्मचारी बाजारात चारचाकी वाहनधारकाकडून हप्ता वसूल करण्यात व्यस्त असते. त्यामुळे इकडे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. कोंढा येथील वाहतूक समस्याअजून किती जणाचा बळी घेणार असा प्रश्न अनेक लोक विचारीत आहेत. (वार्ताहर)