शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

हवामान केंद्राची अधोगती

By admin | Updated: April 19, 2017 00:21 IST

जिल्ह्यातील हवामानाच्या स्थितीची इत्थ्यंभूत माहिती उपलब्ध करुन देणारे हवामान केंद्राच्या वास्तुची अधोगती झाली आहे.

सुविधांचा अभाव : कर्मचाऱ्यांना विषारी श्वापदांचे भयइंद्रपाल कटकवार भंडाराजिल्ह्यातील हवामानाच्या स्थितीची इत्थ्यंभूत माहिती उपलब्ध करुन देणारे हवामान केंद्राच्या वास्तुची अधोगती झाली आहे. मुठीत जीव घेवून येथील कर्मचारी कार्य करीत असून या केंद्राच्या अत्याधुनिकतेकडे जलसंपदा उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे. पाटबंधारे विभाग, जलसंपत्ती विभाग अंतर्गत येणाऱ्या जलसंपदा उपविभागांतर्गत भंडारा तालुक्यातील कारधा येथे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले आहे. सालेबर्डी मार्गावर स्थित असलेल्या या कार्यालयाची अवस्था बिकट होत चालली आहे. झाडाझुडूपांनी वेढलेले हे कार्यालय सहसा नजरेस पडत नाही. या हवामान केंद्राच्या कार्यालय परिसरात चार सदनिका, साहित्य ठेवण्याचे गोदाम व कार्यालयासमोरच्या मोकड्या जागेत तापमान तथा वारा मोजमापक यंत्र स्थापित आहेत. तापमान यंत्र असलेली जागाही झाडाझुडपानी वेढलेली आहे. अशी स्थिती हवामान केंद्राची इमारत तथा सदनिकांची आहे. केंद्राच्या कार्यालयाचे प्रवेशद्वार लाकडी असून ते वाकलेल्या स्थितीत आहे. कार्यालयाचे स्लॅब भिंतीला झुकलेले आहे.कार्यालय सभोवताल असलेली भिंतीला तडे गेले आहेत. शौचालयाची अत्यंत दुरवस्था आहे. या हवामान केंद्राच्या मागील बाजुला रस्ता चौपदरीकरणांतर्गत महामार्ग गेला आहे. परिणामी मागील बाजूची स्वच्छता करण्यात न आल्याने येथील कर्मचारी विषारी श्वापदांच्या भितीत कामे करीत आहेत. येथे दररोज दोन वेळा तापमान, पर्जन्यमान, वारा मोजमाप याची नोंद केली जाते. येथे नोंद करण्यात आलेली माहिती नागपूर विभागाकडे पाठविली जाते. हीच माहिती राज्यस्तरावर उपलब्ध केली जाते. त्यामानाने या कार्यालयाची दुरुस्ती अथवा आधुनिकीकरण होणे महत्वाचे आहे. राज्य शासनाच्या सर्वच विभागाने आधुनिकीकरणाकडे कात टाकली आहे. मात्र, हवामान केंद्राचे कार्यालय आजही अडगळीत आहे. हे केंद्र अपवाद ठरले आहे. या केंद्राच्या आधुनिकीकरणाकडे जलसंपदा विभाग गांभीर्याने लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित होते.