शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

By admin | Updated: September 26, 2015 00:33 IST

माझ्या गैरहजेरीत येवून नवऱ्याला राखी का बांधली या कारणावरुन चुलत नणंदेसोबत झालेल्या भांडणात नणंद

अकोला येथील घटना : मृत्यूस जबादार दोघांविरुद्ध गुन्हे दाखलतुमसर : माझ्या गैरहजेरीत येवून नवऱ्याला राखी का बांधली या कारणावरुन चुलत नणंदेसोबत झालेल्या भांडणात नणंद व भाच्याने त्या महिलेवर हात उगारला. यात तिला अपमानास्पद वाटल्याने या महिलेने मातीचे तेल ओतून पेटवून घेतले. दरम्यान, उपचारादरम्यान तिचा बुधवारला सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. माझ्या मृत्यूला नणद व भाचा कारणीभुत असल्याचे मृत्यूपूर्व बयानात तिने म्हटले होते. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी दोघांविरुध्द भादंवि ३०६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करुन अटक केली आहे. लता पारस माहे (३०) रा. अकोला (आंधळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. सीमा मासुलकर (४०) अर्दिश मासुलकर (१९) रा. मिटेवानी ता. तुमसर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.लता माटे ही तुमसर तालुक्यातील साखळी येथील रहिवासी असून तिचे चार वर्षापुर्वी मोहाडी तालुक्यातील अकोला येथील पारस माटे यांच्याशी विवाह झाला. या विवाहासाठी पारसची चुलतबहिण सिमा मासुलकर यांनी मध्यस्थी केली होती. दोन वर्षांनंतर लता व सिमा यांच्यात पटत नव्हते. मध्यंतरी रक्षाबंधनासाठी सिमा ही अकोला येथे माहेरी आली होती. त्यावेळी लता माटे ही माहेरी गेली होती. त्या दिवशी सिमाने चुलतभाऊ पारस माटेला राखी बांधली होती. माहेरुन परत येताच तिने नवऱ्याकडे राखी कोणी बांधली म्हणून विचारले असता त्याने सिमाने राखी बांधल्याचे सांगताच लता पतीवर जाम भडकली. त्यानंतर पती, चुलत बहिण यांच्यात वाद झाला. भांडणादरम्यान लताला मारहाण झाल्यामुळे तिला अपमानास्पद वाटले. त्यानंतर त्याच रात्री तिने अंगावर केरोसीन ओतून पेटवून घेतले. त्यात ती ७० टक्के जळाल्याने तिला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान बुधवारला तिचा मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी)