शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच; जनजागृतीसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

भंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हा एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात ...

भंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हा एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात सर्वाधिक ऐकावयास मिळाली ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी यावर कुठलाही विश्वास ठेवू नये, अशी सकारात्मक जनजागृती शासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतु ही जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. त्यातच मास्क सोशल डिस्टंसिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर व जनजागृती नेहमीच करण्यात आली. आता लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जीवाचा आटापिटा करावा लागला.

ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली. त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हे एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात सर्वाधिक ऐकावयास मिळाली ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी यावर कुठलाही विश्वास ठेवू नये, अशी सकारात्मक जनजागृती शासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतू ही जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. त्यातच मास्क सोशल डिस्टंसिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर व जनजागृती नेहमीच करण्यात आली. आता लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जीवाचा आटापिटा करावा लागला.

ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली. त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

लसीकरणानंतर मृत्यू होतो

ग्रामीण भागात कुठे कुठे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिक भीतीपोटी लसीकरणासाठी केंद्रांवर गेलेच नाही. हळूहळू जनजागृतीनंतर तरुणांनीच पुढकार घेतला. अफवांवर पटकन विश्वास ठेवणारे लाेकांना ही चूक लक्षात येतय ही महत्वाची बाब ठरली.

निपुत्रिक होण्याची शक्यता

लसीकरणानंतर निपुत्रिक होण्याची दाट शक्यता असते याची अफवाच ग्रामीण भागात पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक स्त्रियाही लसीकरणासाठी गेल्या नाहीत. अशी बाब नंतर उघडकीला आली. मात्र हळूहळू प्रशासनाने ही सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. लसीकरणाला वैद्यकीय आधार आहे, हे महत्वाचे आहे.

लसीकरणानंतर घरघर वाटते

कुठलीही लस घेतली तरी मानवी शरीराचे तापमान वाढत असते. ही एक सहज व सोपी प्रक्रिया आहे. असाच प्रकार कोरोना लसीकरणानंतरही झाला. लसीकरणानंतर घरघर वाटणे, ताप येतो ही साधारण बाब तिखट मिर्च लावून अफवेच्या रुपात सांगण्यात आली. त्यामुळे अनेकांनी लसीकरणाला नकार दिला.

सुरुवातीला कोरोना लसीकरण करून घ्यायचे ठरवले होते. मात्र अफवांमुळे आम्हाला भीती वाटली. आम्ही संभ्रमात सापडलो होतो. परंतू लसीकरणानंतर कुठलीही गंभीर बाब उजेडात आली नाही तसेच शरीरावरही कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.

- एक ग्रामस्थ, अड्याळ

कुठलीही मोहीम येण्यापूर्वी त्याची अफवा पहिले असते त्यामुळे लोकांच्या लवकर विश्वास बसतो. तसेच कोरोना लसीकरणबाबतही झाले आहे. आम्हाला पूर्वी भीती वाटायची, मात्र आता ही भीती दूर झाली आहे.

- एक ग्रामस्थ, पालगाव

जिल्ह्यात लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार सुरू आहे. सुरूवातीच्या काळात ग्रामीण क्षेत्रात काही ना काही अफवा ऐकायला मिळाल्यात. त्याबाबत आम्ही सातत्याने जनजागृतीवर भर दिला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळेतच प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने लसीकरण करून घ्यावे.

- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा