शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू !

By admin | Updated: February 2, 2015 22:59 IST

खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस

तुमसर : खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस बिबट्या मृतावस्थेत पडून होता. शेवटी तो कुजलेल्या स्थितीत आल्यावरही त्याची माहिती वनविभागाला नव्हती. वाघीण व बिबट्यची झुंज झाली व त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा जावई शोध वनविभागाने लावला आहे. मात्र झुंजीच्या खुणा घटनास्थळावर दिसून आल्या नाहीत. तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत खंदाड ते धनेगावपर्यंत राखीव जंगल आहे. खंदाड गावाजवळ कक्ष क्रमांक ७० मध्ये शनिवारी बिबट मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली होती. १० दिवसापेक्षा जास्त दिवस झाल्याने तो कुजलेल्या स्थितीत आला होता. बिबट मृत्यू झालेल्या स्थळापासून ११ केव्हीची उच्च दाबाची वीज वाहिणी गोबरवाही ते सोदेपुरपर्यंत गेली आहे. घटनास्थळाजवळ लाकडी खुंट्या आढळल्या. जंगलात त्या खुंट्या कुठून आल्या असा प्रश्न उपस्थित होतो. गोबरवाही-सितासावंगी रस्त्यावरील हेटी या गावाजवळ रविवारी सकाळी एका महिलेला व तीन युवकांना वाघिण व त्याचे दोन पिल्ले दिसले. खंदाड व सितासावंगीचे अंतर १० ते १२ कि़मी. आहे. वाघीण व बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांनी दिली. तसा अहवाल तयार करण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.वाघीण व तिचे पिल्ले फिरताना बिबट आपल्या पिल्ल्यांना ईजा पोहचवेल म्हणून त्यांच्यात झुंज झाली व यात बिबट्याच्या मानेचे हाड मोडले, असा कयास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. एक महिन्यानंतर फॉरेन्सीक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यावर बिबट मृत्यू प्रकरणातील तथ्य समोर येणार आहे. बिबट्याचा व्हीसेरा वाळल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा पायाचा पंजा व मिशीचे केस फॉरेन्सीक लॅबला पाठविले. नाकाडोंगरी व तुमसर वनपरिक्षेत्राच्या सीमा फिडल्या आहेत. या जंगलात दोन नर व दोन माद्या व त्यांचे पिल्ले असल्याची माहिती उपवनसंरक्षक ठाकरे यांनी दिली. वाघीण व बिबट यांच्यात झुंज झाली, असे वनविभागाचे अधिकारी म्हणत असले तरी बिबट्याच्या शरीरावर किंवा घटनास्थळावर झुंजीच्या खुणा आढळून आल्या नाहीत. सुमारे २० कि़मी. चा परिसर राखीव वनात मोडतो. वन्यपशू येथे असुरक्षित आहेत. (तालुका प्रतिनिधी)