शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मोकाट कुत्र्यांमुळे फुटले खुनाचे बिंग

By admin | Updated: May 24, 2014 23:22 IST

सात जन्माची साथ निभावण्याच्या आणाभाका घेणार्‍या पती-पत्नीच्या पवित्र नात्यात वितुष्ट आले तर कोण कोणत्या पातळीवर जाईल, हे सांगता येत नाही. अशीच थरकाप उडणारी घटना तुमसर

तलावात सापडली हाडे : १५ महिन्यांपासून पुरला होता मृतदेह

मोहन भोयर- तुमसर

सात जन्माची साथ निभावण्याच्या आणाभाका घेणार्‍या पती-पत्नीच्या पवित्र नात्यात वितुष्ट आले तर कोण कोणत्या पातळीवर जाईल, हे सांगता येत नाही. अशीच थरकाप उडणारी घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे दि.२0 मे रोजी उघडकीस आली. मुलगा आणि भावाच्या मदतीने महिलेने पतीचा फावड्याने खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी घरातच खडडा खोदून पुरला. त्यानंतर घराला कुलूप ठोकून ही महिला निघून गेली. दरम्यान या घराचा काही भाग खचला. त्या घरात मोकाट कुत्रे शिरली आणि १५ महिन्यापूर्वी केलेल्या खुनाचे बिंग फुटले.

देव्हाडी येथे काशीराम कुकडे हा बेलदारी काम करायचा. त्याचे २0 वर्षांपूर्वी खैरलांजी येथील शीला पंचबुद्धे हिचेशी लग्न झाले. त्यावेळी ते देव्हाडीत एकत्र कुटूंबात राहायचे. काही वर्षे सुखाचा संसार सुरु असतानाच काशीरामला दारुचे व्यसन जडले. त्यानंतर पतीपत्नीमध्ये भांडणे सुरु झाली. दरम्यान गावातील तलाव परिसरातील शेतात लहानसे घर बांधून ते राहू लागले. परंतु भांडणे सुरुच राहिली. नेहमीच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी पत्नी शीलाने कट रचला.

असा केला खून

घटनेच्या दिवशी काशीरामची पत्नी शीला, मोठा मुलगा संतोष, लहान मुलगा सुरज व तिचा भाऊ संजय पंचबुद्दे हे देव्हाडीत होते. त्यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. लहान मुलगा सुरज हा वडिलाचा लाडका असल्यामुळे त्याला मटन आणण्यासाठी बाहेर पाठविले. त्यानंतर मोठा मुलगा संतोषने काशीरामच्या डोक्यावर फावड्याने वार केला. यात तो खाली कोसळला. त्यानंतर संजयने त्याच फावड्याने पुन्हा वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातच दोन फुटाचा खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरला.

काशीरामवर होता खुनाचा

प्रयत्न केल्याचा गुन्हा

संजय बहिणीच्या पतीच्या खूनात सहभागी होण्याचे कारण पोलिसांनी शोधले असता, दोन वर्षांपूर्वी काशीरामने संजयच्या आईवर कुर्‍हाड उगारली होती. त्यात ती थोडक्यात बचावली. याप्रकरणी काशीरामविरुद्ध ३0७ कलमान्वये खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपात अटक झाली होती. एक दिवस काशीरामचा वचपा काढण्याची खूणगाठ संजय पंचबुद्धे याने बांधली होती.

पोलिसांनीही केले होते दुर्लक्ष

फेब्रुवारी २0१३ मध्ये काशीरामचा खून करुन मृतदेह घरात पुरल्यानंतर हे घर कुलूपबंद होते. काशीरामच्या घराच्या परिसरात कुणाचीही घरे नसली तरी मृतदेहाला सुटलेल्या दुर्गंधीकडे देव्हाडी पोलिसांचे लक्ष वेधले होते. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना दबून राहिली. अखेर १५ महिन्यानंतर या घराचा काही भाग खचला आणि मोकाट कुत्रे घरात शिरले. हे कुत्रे काही ना काही सामान घराबाहेर आणत असल्याचे पाहून लोकांनी उत्सुकतेतून घरात डोकावून पाहिले असता त्यांना खडडा खोदून बुजविलेल्या स्थितीत आढळून आला. पोलीस त्यावेळीच आले असते तर कदाचित ही घटना पूर्वीच उघडकीस आली असती.