शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मोबाईल टॉवर्सची धोक्याची घंटा

By admin | Updated: February 27, 2015 00:32 IST

मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो.

भंडारा : मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो. इतकेच नाही तर एका प्रयोगानुसार गरोदरपणाच्या काळात मोबाईलच्या वापरामुळे त्याच्यातून निघणारी किरणे होणाऱ्या बालकांवर नकारात्मक प्रभाव टाकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या किरणांचा मोठा प्रभाव हृदयावरही पडतो. माणूस हा विद्युत संवेदनशील म्हणजे इलेक्ट्रिकली सेन्सेटिव्ह असतो. जेव्हा मायक्रोवेव्ह रेडिएशन मोबाईलमधून येतात, तेव्हा ते हृदयाला प्रभावित करतात. याच्या अधिक वापरामुळे इतर काही लक्षणेही दिसतात. यामध्ये डोक्याच्या त्वचेमध्ये जळजळ होणे, थकवा येणे, झोप न येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थपणा, हृदयाचे ठोके वाढणे इतकेच नाही तर पचनक्रियेवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. युरोपीय रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधनानुसार मोबाईलमधून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे किडनी स्टोन किंवा आरोग्यासंबंधी अन्य गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या वापरामुळे कर्करोग झाला असे सांगण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा नसतो. कारण मोबाईल वापरण्याआधीची आकडेवारी, मोबाईल वापरल्यानंतरची आकडेवारी, तसेच मोबाईल किती प्रमाणात वापरला याची आकडेवारी आणि त्यातून सांख्यिकीदृष्ट्या काढलेला निष्कर्ष ही सगळी प्रक्रिया किचकट आहे. म्हणूनच याबाबतचे ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत, पण तरीही आपल्याला अनेक वर्षांपासून किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम माहीत असल्याने आपण त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करू शकतो. भारतात जवळपास ९० कोटी लोक मोबाईल फोनचा वापर करतात.रस्ता ओलांडताना, गाडी चालवताना, इतकेच नाही तर रेल्वे रुळ ओलांडतानादेखील माणसे मोबाईलवर बोलत असतात. त्यातूनच अपघाताच्या अनेक घटना घडतात, पण तरीही आपण जागृत होत नाही. ‘प्राण जाये पण मोबाईल न जाये’ अशी स्थिती आपल्याकडे आलेली दिसते, पण ही परिस्थिती खूप घातक आहे.