मुखरु बागडे ल्ल पालांदूरबदलत्या अर्थव्यवस्थेनुसार बदलत शेतीला पूरक व्यवसाय न समजता शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. संपूर्ण कुटुंब पशुपालनात गुंतून दुधाचे उत्पादन वाढविले. मात्र दुग्ध उत्पादक संघाच्या धोरणामुळे मागील ६० दिवसाचे दुधाचे चुकारे शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना नियमित चुकारे मिळत होते. अधिकाधिक नफा कसा मिळेल याकरिता प्रयत्न करीत दुग्ध संघाने प्रयत्न केले. मात्र अलिकडे दूध संघाने अधिक नफ्याकरिता दूध खासगी संस्थांना विकत आहे. परिणामी सामान्य दूध डेअरीला ५-६ हप्ते चुकारे मिळत नाही. संचालकांच्या डेअरींचे चुकारे दर हप्त्याला दिले जात आहे. संघांचे संकलीत दूध खासगीत जात असल्याने दर व नफ्याच्या प्रमाणात तुट येत आहे. दुधाचे दर दररोज कमी होत असताना खावटीचे दर मात्र वाढत आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला असून काहींनी दूध उत्पादन बंद करून दुभत्या गाई, म्हशी विकून टाकल्या आहेत. हे वास्तव जिल्हाभर सुरु असून संचालक मंडळाला वास्तव स्थितीचा अभ्यास असतानाही ते अन्यायाविरुद्ध आवाज उचलत नाही. तत्कालीन अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या कार्यकाळात दूध संघाला मालकीची इमारत मिळाली. त्यावेळी शेतकऱ्यांचे चुकारे अडले नव्हते. त्यावेळी दुधाला योग्य दर व नियमित चुकाऱ्यांमुळे दुग्ध व्यवसायिक सुस्थितीत होता. मात्र दुध संघाने दूध भुकटी पावडर कारखाना सुरू केला. यात मोठी रक्कम गुंतल्यामुळे त्याचा थेट फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे दुधाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी दूध उत्पादन बंद करण्याच्या मार्गावर आहे. दुध उत्पादकांना चुकारे न देता आता दूध संघाने पशुखाद्य निर्मिती कारखाना सुरू करण्याची योजना आखली आहे. खासगी व्यापाऱ्यांकडे संघापेक्षा दीड दोन रुपये अधिक दर देऊन बाराव्या दिवशी चुकारे दिले जात आहे. त्यामुळे संघाच्या दूध डेअरी संचालकांनी दूध खासगीत विकणे सुरु केले आहे.दूध संघाने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधी याविरुद्ध बोलत नाहीत. हे आमचे दुर्भाग्य आहे. दररोज दूध संकलन कमी होत असल्यामुळे भविष्यात डेअरी व संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे.- पांडुरंग खंडाईतअध्यक्ष, जय लहरी दुग्ध संस्था, कवलेवाडा.देशभरात दुधाचे दर घसरले आहेत. भंडारा दुग्ध संघाने भुकटी पावडर कारखाना लावून उत्पादन सुरु केले आहे. दुग्धजन्य पदार्थांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे देण्याकरिता विलंब होत आहे.-करण रामटेकेकार्यकारी संचालक, दुग्ध संघ भंडारा.
दुग्ध उत्पादक संकटात
By admin | Updated: September 29, 2015 02:09 IST