शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ॲझोला पानवनस्पतीचे संगोपन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

भंडारा तालुका कृषी विभागातर्फे कृषी सप्ताहानिमित्त दहा टक्के रासायनिक खत बचत मोहिमेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांशी ते बोलत होते. भंडारा तालुका ...

भंडारा तालुका कृषी विभागातर्फे कृषी सप्ताहानिमित्त दहा टक्के रासायनिक खत बचत मोहिमेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांशी ते बोलत होते. भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील पलाडी, भिलेवाडा, सिरसी, जाख, शहापूर, खरबी,माटोरा येथे आयोजित उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दहा टक्के खत बचत मोहीम तसेच ॲझोला पानवनस्पतीचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पहेलाचे मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, भंडारा मंडळ अधिकारी दीपक आहेर, पर्यवेक्षक विजय हुमणे, कृषी अधिकारी कळाम, कृषी सहाय्यक गिरीश रणदिवे, कृषीसेवक भाग्यश्री पडोळे, देवा जवंजाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कोटांगले यांनी शेतकऱ्यांना ॲझोला कल्चर बनविताना तीन फूट रुंद, दहा फूट लांब, अर्धा फूट खोल टाकी तयार करून त्यामध्ये शेण, माती, सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करुन त्या टाक्यामध्ये पाणी भरून ॲझोला कल्चर कसे सोडायचे हे प्रात्यक्षिकातून दाखविले. दर चौरस मीटरला ३०० ग्रॅम ॲझोला धानाच्या बांधीत टाकल्यास दहा ते पंधरा दिवसात त्याची भरघोस वाढ होऊन प्रतिहेक्‍टरी पाच ते दहा टन ॲझोला तयार होऊन पिकास उपलब्ध होतो. यामुळे युरिया खताची गरज भासत नाही. त्यामुळे अझोला कल्चर हे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरते. मंडळ अधिकारी होमराज धांडे यांनी ॲझोला कल्चर दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसे फायदेशीर ठरते व त्याचा शेतीसाठी कसा उपयोग होतो हे सांगितले. कृषी सहायक गिरीश रणदिवे यांनी ॲझोलाचे प्रात्यक्षिक दाखवले. संचालन कृषी सहायक गिरीश रणदिवे यांनी केले तर आभार देवा जवंजाळ यांनी मानले.

बॉक्स

ॲझोला या पानवनस्पतीचे अनेक फायदे

हवेतील मुक्त नत्र स्थिर करून ३० ते ४० किलो नत्र प्रति हेक्‍टरी मिळत असते. यामुळे युरिया खताची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो. वनस्पतीमध्ये वाढ वर्धक पदार्थ जमीन तयार करून सोडल्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. प्रतिहेक्‍टरी उत्पादन २० ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ होते. हरितद्रव्य मुक्त हिरवी पानवनस्पती असल्याने हवेत प्राणवायू सोडते व हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. दुभत्या जनावरांना दररोज खाद्यान्नामध्ये दिल्यास दुधात फॅटचे प्रमाण वाढते. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भंडारा तालुक्यात कृषी सप्ताहात ॲझोला वनस्पतीचे प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहेत.