शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सामना; सट्टा बाजार जोरात!

By admin | Updated: March 26, 2015 00:30 IST

विश्वकप क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरीत भारत व आस्ट्रेलिया चा सामना होत आहे.

तुमसर : विश्वकप क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरीत भारत व आस्ट्रेलिया चा सामना होत आहे. सातासमुद्रापार ही झूंज होत असली तरी शहरात या स्पर्धेवर लाखोंचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे. या व्यवसायाचे तार गोंदिया व नागपूरच्या बुकींशी जुळल्याची माहिती आहे.कुबेरनगरी म्हणून तुमसरची ओळख असून सध्या तुमसरात क्रिकेट ‘फिवर’ चढल्याचे दृश्य तालुक्यात आहे. या क्रिकेट स्पर्धेतून आर्थिक फायदा व्हावा याकरिता विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच सट्टा त्यावर खेळणे सुरू झाले होते. गुरूवारी उपांत्य सामना भारत व आस्ट्रेलिया या संघादरम्यान होत आहे. याकरिता बुकींनी आपले एजेन्ट सक्रीय केले आहेत. आस्ट्रेलिया संघाला सध्या झुकते माप देण्यात आले आहे. एक रूपयाला ४५ पैसे असा भाव आस्ट्रेलिया संघाचा आहे, अशी माहिती आहे. भारताचा भत्तव १ रूपया आहे. सट्टा खेळणारे येथे संभ्रमात आहेत. तुमसरचे तार गोंदिया व नागपूरच्या बुकींशी जुळल्याची माहिती आहे. स्थानिक स्तरावर या बुकींचे दोन ते तीन प्रमुख एजेन्ट असतात. या एजेन्टांचे सब एजेन्ट आहेत. सर्वसामान्य नागरिकांना त्यांची माहिती नाही. गोपनीय पद्धतीने हे नेटवर्क सुरू आहे. सायबर, मोबाईल या आधुनिक तंत्रज्ञानाचा येथे उपयोग होत असल्याने गृहखाते अनभिज्ञ दिसत आहे. शहरात या सट्ट्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यात काही मोठी रक्कम गमावून बसतील तर काही रक्कम जिंकतील, सध्या येथे सट्टाबाजार मात्र जोरात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)