विनोबा भावे नगरातील प्रकार : १० ते १२ घरांना बेटांचे स्वरुपतुमसर : विनोबा नगरात १० ते १२ घरांसमोर पावसाचे पाणी वाहून आल्याने कृत्रिम तलाव निर्माण झाले. येथील नागरिकांना घराबाहेर कसे पडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. विनोबा भावे नगरातील बावनथडी कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर खोलगट भाग आहे. १० ते १२ घरांसमोर मोकळे मैदान आहे. राजाराम लॉन्स परिसरातून पावसाचे पाणी या घरांसमोर येऊन जमा होते. नाली ओव्हरफ्लो होऊन हा पाणी वाहतो. या रस्त्यावर जसा लहान नाला वाहतो असे दृष्य असते. राजाराम लॉन्स गल्लीतून सहजा पाण्याच्या लोंढ्यामुळे महिला व लहान मुले जात नाही. पाणी वाहण्याची गती तीव्र असते. येथे प्रा.विद्यानंद भगत यांच्या घराला तर बेटाचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यांच्या घराची विहीर तुडूंब भरली. विहिरीत मोटार पाण्यात बुडाली. घरीे यायला रस्ताच नाही. जिकडे तिकडे पाणीच पाणी येथे आहे. नगरपरिषद सदस्यांना अनेकदा भेटून समस्या सांगितली. परंतु समस्या सुटली नाही. जणू नागरिक तलावात राहतात अशी येथील स्थिती आहे. नगरपरिषदेने लक्ष देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)
पावसाळ्यात कृत्रिम तलावाची निर्मिती
By admin | Updated: August 11, 2016 00:28 IST