शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

मातृशक्तीमुळे समाजाची निर्मिती

By admin | Updated: March 6, 2017 00:19 IST

भारतीय तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी ...

सविता पुराम : भाजप महिला मोर्चा मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम आमगाव : भारतीय तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली, दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. पूजा जरी पुरुष देवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तींची असे उदगार जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सविता पुराम यांनी काढले. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आमगाव तालुका यांच्या वतीने महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक श्री लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला तालुका अध्यक्ष मोहिनी निंबार्ते, उद्घाटक सविता पुराम, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, महिला व बालकल्याण सभापती छाया दसरे, सविता इसरका, सुनंदा उके, अर्चना चिंचाळकर, अंजली जांभूळकर, सुषमा भुजाडे, ज्योती खोटेले, लीला कठाणे, योगीता पुंड, वंदना मटाले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात पुढे सविता पुराम यांनी स्त्री ही त्याग, नम्रता, श्रध्दा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. आज प्रत्येक पावलावर महिलांनी शिखर गाठला आहे. भारतीय संस्कृतीने समाजाला एकत्रीत करण्याची क्षमता दिली आहे. संस्कृतीचे जतन व आधुनिक विकासाचे धरोहर आपल्यावर आहे. मातृशक्तीमुळे सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. भावी पिढी घडविण्यासाठी मातृशक्तीने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, छाया दशहरे, सविता इसरका यांनी मार्गदर्शन केले. आयोजित महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी नृत्य, हळदीकुंकू भेट वस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अर्चना चिंचाळकर यांनी तर आभार अंजली जांभूळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप महिला पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. मेळाव्याला आ. संजय पुराम, महिला सरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्या यांनी भेट दिली. जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी महिलांना प्रोत्साहन करणारे मार्गदर्शन केले. (वार्ताहर)