शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जनतेत आपलेपणाची भावना निर्माण करा

By admin | Updated: April 11, 2016 00:31 IST

एखाद्या शासकीय कार्यालयात गेल्यावर हे कार्यालय आपले आहे अशी भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

जगन्नाथ भौर यांचे प्रतिपादन : समता सप्ताहाचे उदघाटनभंडारा : एखाद्या शासकीय कार्यालयात गेल्यावर हे कार्यालय आपले आहे अशी भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. हे शासन, प्रशासन आपल्यासाठी काम करते याची जाणीव झाली तरच जनता शासकीय कार्यालयात जाऊन आपले प्रश्न सोडवू  शकतील.  जनतेमध्ये ही आपलेपणाची भावना निर्माण करण्याचे काम  शासन, प्रशासनात काम करणाऱ््यांनी केले पाहिजे, असा अर्थ  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत  होता, असे  प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित समता सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे उपस्थित होते. भोर म्हणाले, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. मात्र, त्यांना अपेक्षित असलेली समता आपण अजूनही प्रस्थापित करू शकलो नाही. श्रीमंती- गरीबीची दरी वाढत आहे. महिलांना अजूनही सामान न्याय मिळालेला नाही. समता सप्ताहाच्या निमित्ताने सर्व समाजात समता प्रस्थापित करू याचा निर्धार करुया, असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी अमित मेश्राम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  शिक्षणापासून ते सिंचनापर्यंत सर्व क्षेत्रात काम केले. दामोदर व्हॅली सारखे धरण बांधण्याची योजना त्यांची होती. देशातल्या सर्व भागातनैसर्गिक साधन सामुग्रीचा समान  वाटा सवार्ना मिळाला पाहिजे हे त्यांची न्याय बुद्धी होती. बाबासाहेबांचे असे  अनेक कार्य आहेत जे अद्यापही लोकांना माहिती नाही. इतके अफाट काम एका आयुष्यात या महामानवाने जिथे पुढारलेल्या देशांनीही महिलांना मतदानाचा हक्क देण्यास टाळाटाळ केली तिथे स्वतंत्र  भारतातील महिलांना लगेच मतदानाचा हक्क केवळ बाबासाहेबांमुळे मिळू शकला. स्त्रियांना प्रसूती रजा देण्याचा अधिकार असो की, संपत्ती मधे समान वाटा, बाबासाहेबांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीत समानता दिली. मात्र स्वातंत्र्याच्या ६९ वषार्नंतर सुद्धा आजही महिलांना मंदिरात प्रवेश बंदी केली जाते.  शिक्षण, नोकरी, राजकारण कुठेही महिलांना समान संधी अजूनही मिळाल्या नाहीत. आजही  त्यांना ३३ टक्के आरक्षणाच्या  बेडीत अड़कवून ठेवले आहे.  म्हणजेच बाबासाहेबांना जी समता अभिप्रेत होती ती आपण अजूनही प्रस्थापित करू शकलो नाही असे मत मनीषा सावळे यांनी व्यक्त केले. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त धारगावे यांनी प्रस्ताविक करताना बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच समता सप्ताहांत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला दलित मित्र,  सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)