शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महामंडळाचे ९.५ लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

सालेकसा : आदिवासी विकास महामंडळअंतर्गत खरीप हंगामातील धान खरेदी करणाऱ्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील एकूण ४४ केंद्रांवर नऊ लाख ५० हजार ...

सालेकसा : आदिवासी विकास महामंडळअंतर्गत खरीप हंगामातील धान खरेदी करणाऱ्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील एकूण ४४ केंद्रांवर नऊ लाख ५० हजार क्विंटल धानाचे डीओ न मिळाल्याने उचल झाली नाही. त्यामुळे हा धान खुल्या आकाशाखाली उघड्यावर पडले असून आतापर्यंत याच्यावर चार-पाच वेळा अवकाळी पावसाचा मारा बसलेला आहे. आता या धानाची लगेच उचल न झाल्यास धान मोठ्या प्रमाणात खराब होऊन पाखड होईल किंवा सडून जाईल. अशात याचा भुर्दंड आपल्यावर बसणार याची भीती सेवा सहकारी संस्थांना सतावत आहे.

केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या आधारभूत हमीभावात शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याची जवाबदारी राज्य शासन पार पाडत असते. राज्य शासनाने धान खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मंडळ यांना धान खरेदी एजंट नियुक्त केले आहेत. मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने सेवा सहकारी समिती आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी विविध कार्यकारी संस्था उपएजंटच्या रूपात धान खरेदी करतात. धान खरेदीबाबत आदिवासी विकास महामंडळ आणि राज्य शासन यांच्यात करार केला जातो. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि महामंडळ यांच्यामध्येही करार होतो. त्यानुसार आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था धान खरेदी करतात.

खरेदी केलेला धान संग्रहित व सुरक्षित ठेवण्यासाठी आदिवासी महामंडळाकडे कसलेही गोदाम किंवा इतर भाड्याचे गोदाम करून घेण्याची व्यवस्था नाही. अशात खरेदी केंद्रातच जमिनीवर उघड्यावर धानाची पोती पद्धतशीर ठेवण्यात येतात. ते धान वेळेवर डीओ काढून मिलिंगसाठी पाठविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते.

राज्य सरकार हे काम आदिवासी विकास मंडळाकडून करवून घेते; परंतु धानाची उचल न झाल्यास खुल्या मैदानात ठेवलेल्या धानात पावसाचे पाणी शिरते. तसेच वरपर्यंत ओलावासुद्धा वाढतो. अशात मोठ्या प्रमाणावर धानाची पाखड झालेली असते किंवा खालचे धान पूर्णपणे सडून जाते. जास्त दिवस ठेवले की उंदीर व घूससुद्धा धानाचे मोठे नुकसान करून ठेवतात. उशिरा डीओ मिळाल्यावर धानाची उचल करताना झालेल्या नुकसानीची भरपाई खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांकडून दीड पटीने बाजूला केली जाते. यासाठी त्या संस्थांचे कमिशन अडवून ठेवले जाते. विशेष म्हणजे, जोपर्यंत धानाची उचल होत नाही, तोपर्यंत त्या संस्थांना कमिशन दिले जात नाही. धानाची उचल करण्याची जवाबदारी पूर्णत: महामंडळ आणि राज्य शासनाची असते. यंदा पूर्व विदर्भात आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय भंडाराअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांकडून गोंदिया, भंडारा जिल्ह्यांतील एकूण ४४ धान खरेदी केंद्रांवर एकूण ११ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यापैकी जेमतेम एक लाख क्विंटल धानाचे डीओ करून उचल झाली आहे. नवेगावबांधचा एक अपवाद वगळता महामंडळाकडे कुठेच गोदामाची सोय नाही.

भाड्याने घेण्याचे प्रावधानसुद्धा नाही. परिणामी नऊ लाख ५० हजार क्विंटल धान उघड्यावर पडून वरून ताडपत्रीचा आधार असला तरी पावसाचा मार सहन करणे धानाला शक्य नाही. यामध्ये देवरी उपविभागअंतर्गत एकूण २८ केंद्रांवर सहा लाख ७० हजार १६९ क्विंटल धान खरेदी झाले आणि दोन महिन्यांचा कालावधी खरेदी बंद केल्यापासून लोटला तरी डीओ मिळाले नाही आणि धानाची उचल झाली नाही. दरम्यान, मे महिन्यात चार-पाचवेळा अवकाळी पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी धानाच्या बुडाखाली पाणी शिरले आहे.

पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असून त्यापूर्वी उचल न झाल्यास नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.

पुन्हा संस्थांमध्ये तीच भीती

२००१ पासून २०१४ पर्यंत आदिवासी विकास महामंडळाने कोणत्याही वर्षी वेळेवर धानाची उचल केली नव्हती. पावसाचा फटका बसल्यावर धानाची उचल होत गेली. त्यामुळे एकतर धान सडलेले, कुजलेले तसेच धानात मोठी घट याची नुकसानभरपाई खरेदी करणाऱ्या संस्थेच्या माथ्यावर टाकली. राज्य शासनाने महामंडळामार्फत सहकारी संस्थांवर १५ वर्षांतली १०० कोटींची रिकव्हरी काढली. राज्यभरातील खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांनी भरपाई देण्यास असमर्थता दाखविली तेव्हा शासनाने १५ वर्षांची कमिशन रक्कम जवळपास ३० कोटी रुपये दिलीच नाही. सर्व सहकारी संस्था डबघाईस गेल्या होत्या. २०१६ ला ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली असता शासनाने याची दखल घेऊन खरेदी करतानाच्या दरम्यान डीओ काढून धानाची उचल करण्याची व्यवस्था केली. वेळेवर धानाची उचल झाल्याने सेवा सहकारी संस्थांना कमिशनची रक्कमही मिळत गेली व धानाचे नुकसान झाले नाही. त्यामुळे संस्थांची आर्थिक परिस्थिती सुधारली. ही व्यवस्था २०१९ पर्यंत सुरळीत चालली असून आता यंदा पुन्हा २०१४ च्या पूर्वीसारखी गत निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा सहकारी संस्थांना भुर्दंड बसण्याची भीती वाटू लागली आहे.