शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मोहिमेत ९४ हजार व्यक्तींचे कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, लगतच्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा धोकाही पुढे दिसत आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविली. सूक्ष्म नियोजन आणि गावपातळीवरील यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय साधून ही मोहीम २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात आली. नागरिकांना फोन करून लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओमायक्रॉन व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मिशन लेफ्टआऊट या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ९४ हजार २४७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यापैकी १८ हजार ३२ नागरिकांना पहिला तर ७६ हजार २१५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. या मोहिमेसाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व सहभागी झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, लगतच्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा धोकाही पुढे दिसत आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविली. सूक्ष्म नियोजन आणि गावपातळीवरील यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय साधून ही मोहीम २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात आली. नागरिकांना फोन करून लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील जांब येथे फिरत्या पथकाने चक्क एका बैलगाडीवर तरुणाला लस टोचली.

शिवनी ठरले पहिले लसवंत - लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा या गावात १०० टक्के लसीकरण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील पहिले लसवंत गाव ठरले. दुर्गम भागातील आदिवासीबहुल आलेसूरही सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष पुढाकार घेतल्याने लसीने संरक्षित झाले आहे. ९६ वर्षांच्या आजीबाईपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि गृहिणींचे कार्यस्थळी जाऊन मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करण्यात आले.

मुंबईनंतर भंडारा अव्वल- राज्यात मुंबईनंतर दुसरा डोस ८० टक्के पार करणारा जिल्हा म्हणून भंडारा पुढे आला आहे. ही बाब निश्चितच समाधानाची आहे. राज्यामध्ये सुरुवातीला लसीकरणामध्ये मुंबई, पुणेनंतर भंडारा जिल्हा तिसऱ्यास्थानी होता. परंतु मिशन लेफ्टआऊटच्या यशस्वितेने भंडारा जिल्हा दुसऱ्या डोसमध्ये राज्यात दुसरा क्रमांकावर आला. लसीकरणाला जिल्ह्यात गतवर्षी १६ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी साधला गावपातळीवर समन्वय- कोरोना लसीकरणासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विशेष पुढाकार घेतला. गावागावांना भेटी देऊन नागरिकांना प्रोत्साहित केले. गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना मार्गदर्शन केले. वाढती कोरोना रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सूचकता दर्शविणारी आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर वापरावे, शारीरिक अंतर ठेवावे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस