शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनेकांकडून अनावश्यक खर्चाला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:35 IST

लग्न एकदाच, परत नाही असे बोलून लग्नसोहळ्यात लाखो रुपयांचा चुराडा होत होता. या अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे ...

लग्न एकदाच, परत नाही असे बोलून लग्नसोहळ्यात लाखो रुपयांचा चुराडा होत होता. या अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे सुरू झाले. कीर्तनकार व प्रवचनकार अनेकवेळा खर्च टाळण्याचे आवाहन करतात. मात्र, यात त्यांना अद्याप तरी फारसे यश आलेले नाही. जिल्ह्यात दरवर्षी हजारांवर लग्नसोहळे होतात व त्यात २ लाखांपासून ते कोट्यवधी रुपयांचा खर्चा केला जातो. काही श्रीमंत नागरिक तर श्रीमंतीचे दर्शन घडवतात. त्यांचे बघून गोरगरीब व मध्यमवर्गीयही कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे विवाह थाटामाटात करू लागले. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी अनेक मंडळींनी आजपर्यंत प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. गोरगरीब कुटुंबीयांचा लग्नाचा खर्च वाचावा यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळे घेतात. यावर्षी कोरोनामुळे सामूहिक विवाह सोहळे रद्द झाले. मात्र, कोरोनामुळे गर्दीवर नियंत्रण आल्याने पर्यायाने खर्चावरही निर्बंध आले आहेत. लग्नसमारंभाचे सोहळे शाही थाटात करण्याची जणू परंपराच सुरू झाली आहे. लग्नपत्रिकेतील नावे, हळदी समारंभाला लाखो रुपये खर्च, वरातीत धूमधडाका, पक्वान्नांची जेवणावळ, मिरवणुकीला हत्ती, घोडे त्यात डीजेचा आवाज अशा लग्नसोहळ्यांवर आता आपसूकच निर्बंध आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च कमी झाला आहे.