शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे सहा ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात बुधवारी ३८४ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी कुणी पॉझिटिव्ह आढळून आला नाही, तर एक व्यक्ती कोरोनामुक्त झाला. सध्या जिल्ह्यात सहा ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेला डेल्टा प्लसचा एक रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा हळूहळू कोरोनाचे रुग्ण आढळू लागले असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.भंडारा जिल्ह्यात बुधवारी ३८४ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी कुणी पॉझिटिव्ह आढळून आला नाही, तर एक व्यक्ती कोरोनामुक्त झाला. सध्या जिल्ह्यात सहा ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेला डेल्टा प्लसचा एक रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात घेतलेल्या या रुग्णाच्या नमुन्यांचा अहवाल ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात प्राप्त झाला. तोपर्यंत हा रुग्ण ठणठणीत बरा झाला होता. त्याच्या संपर्कातील कुणालाही डेल्टा प्लसची लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४६ हजार ८०९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात साठ हजार ८० व्यक्ती बाधित आढळून आलेत. त्यापैकी ५८ हजार ९४१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ११३३ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला आहे. 

नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन- जिल्ह्यात डेल्टाप्लस व्हेरिएंटचे आगमन झाले असून ही सर्वांसाठी धोक्याची सूचना आहे. असे असतानाही संपूर्ण बाजारपेठ खुली असल्याने नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. अनेक जण विना मास्क भटकताना दिसून येत आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून फिजिकल डिस्टंन्सिंगचेही उल्लंघन केले जात आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या