शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिसी गुंतवणूकदारांवर संक्रांत

By admin | Updated: November 29, 2015 01:32 IST

शहरात भिसीचा व्यवसाय तेजीत सुरू असून काही व्यावसायिकांनी अनेकांकडून लाखो रूपये घेऊन सर्वांच्या भीसी बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तुमसरातील प्रकार : भिसी जमा करणारे शहरातून पसार, गुंतवणूकदार चिंतेततुमसर : शहरात भिसीचा व्यवसाय तेजीत सुरू असून काही व्यावसायिकांनी अनेकांकडून लाखो रूपये घेऊन सर्वांच्या भीसी बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील मुख्य सुत्रधार शहर सोडून पसार झाला आहे. यामुळे शहरातील भागधारकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा भडका कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता बळावली आहे.तुमसर हे शहर व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. अनेक वर्षापासून येथे भिसीचा व्यवसाय केला जातो. यात अनेक व्यापारी व सामान्य नागरिक गुुंतले असून त्यांनी गुंतवणूक केली होती. काहींनी १० लाख तर काहींनी ५ लाखांची म्हणजे दोन लाखांपासून २० ते २५ लाखापर्यंत ही गुंतवणूक केली. अनेकांनी भिसीचे हप्ते भरले. अनेकांना त्यांचा लाभ झाला, परंतु मागील एका महिन्यापासून शहरातील भीसी सुरू करणारे चिंतेत आहेत. कारण भिसी मालकाने हात वर केले. काही भिसी मालक शहर सोडून गेले त्यामुळे तणावाची स्थिती आहे.व्यावसायिकांना नगदी रकमेची गरज पडते म्हणून व्यावसायिक महिन्याला सुलभ हप्ते भरतात. त्यात ज्यांना गरज आहे ते या रकमेची बोली बोलून कमी खर्चात ती घेतो यामुळे अनेक व्यावसायिकांना वेळेवर रकमा मिळून जातात. यामुळे अनेकांनी यात गुंतवणूक केली, परंतु मागील एक महिन्यापासून शहरातील भिसी उघडणारे ओरडत आहेत. यात तीन भिसी मालकांनी हात वर केल्याचे समजते. यात लाखोंची अफरातफर झाल्याचे बोलले जात आहे. काही शहर सोडून गेले तर गुंतवणूकदार मुळ रक्कम मागण्यास गेल्यावर रक्कम देण्यास नकार दिला. काहींनी आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.या सर्व प्रकरणात काय करावे या विवंचनेत हे गुंतवणुकदार आहेत. भिसी सुरू करण्यासंदर्भात शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही. सरकारचा येथे हस्तक्षेप नसल्याने कुणाकडे जावे, असा सूर सध्या भिसी गुंतवणूकदार करीत आहेत. आर्थिक मोह येथे गुंतवणुकदारांना नक्कीच भोवला, असे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)