शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा जिल्हा परिषद गटाच्या निकालाचा वाद न्यायालयात

By admin | Updated: August 5, 2015 00:51 IST

जिल्हा परिषद निवडणुकीत कोंढा क्षेत्रातील मतमोजणीत २१० मतांचा घोळ करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ...

मतांचा घोळ : राज्य निवडणूक आयुक्ताकडे तक्रार कोंढा (कोसरा) : जिल्हा परिषद निवडणुकीत कोंढा क्षेत्रातील मतमोजणीत २१० मतांचा घोळ करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी गंगाधर जिभकाटे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.पवनी तालुक्यातील कोंढा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत राकाँचे विवेकानंद कुर्झेकर यांनी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांचा ४२ मतानी पराभव केला. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी एच.ए. गवळी होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार एन.जी. राचेलवार हे होते. कोंढा जिल्हा परिषद गणाची मतमोजणीनंतर जोडपत्र-३ तयार केले. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या मताचा हिशेब होता. हस्तलिखित व संगणकाच्या प्रतीमध्ये मोठी तफावत असल्याचे अनेक उमेदवारांच्या लक्षात आले. मतदान केंद्र क्रमांक ७ आकोट येथील मतदान यंत्रात ६१३ मतदान झाले. त्यानुसार होमराज उपरीकर २२, विजय काटेखाये ४०, विवेकानंद कुर्झेकर १७२, गंगाधर जिभकाटे ११५, धनराज जिभकाटे १९७, आशिष माटे ६१ आणि नोटा ०६ मते मिळाली. याची प्रत काढताना जोडपत्र ३ मध्ये धनराज जिभकाटे यांना मिळालेले १९७ मते जोडपत्रात दाखविले नव्हते. त्यानंतरच्या प्रपत्रात दाखविल्याचे समजते. कोसरा मतदान केंद्र क्रमांक १४ येथे मतदान यंत्रात ७०९ मते नोंदविले असे नमूद व्हीएम भाग ३ मध्ये मतदान केंद्राध्यक्षानी दिलेल्या प्रपत्रात असताना मतदान मोजणीवेळी जोडपत्र ३ मध्ये ७०१ मते दाखविले त्यामध्ये ८ मताचा फरक पडतो आहे. हे ८ मतदानाचा हिशेब अजुनपर्यंत मिळाला नाही.कोंढा पंचायत समिती गण ८४ मतदान केंद्र क्रमांक १४ कोसरा येथे जोडपत्र ३ मध्ये ६९६ मते झाल्याचे दाखविले आहे. भंडारा जिल्हा परिषद व पवनी पंचायत समितीची निवडणूक एकत्र झाली तेव्हा जिल्हा परिषदला ७०१ मतदानाचा हिशेब दाखविले तर पंचायत समितीसाठी ६९६ मतदानाचे जोडपत्र ३ मध्ये दाखविण्यात आले आहे. मतदान केंद्र क्रमांक १४ कोसरा येथे मतदान केंद्राध्याक्षाच्या नमुणा व्हीएम ३ नुसार ७०९ मतदान झाले तर १३ मताचा फरक मतमोजणीत कसा झाला याचा खुलासा होणे आवश्यक होते. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी गवळी यांच्या या चुका लक्षात आणून दाखविण्यात आले परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जिभकाटे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी एच.ए. गवळी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद होता. (वार्ताहर)