शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

शेंगा पोखरणाऱ्या अळीचे वेळीच नियंत्रण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST

तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून तालुक्‍यात साधारणपणे साडेतीन ते चार हजार हेक्‍टरवर तूरीची लागवड ...

तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून तालुक्‍यात साधारणपणे साडेतीन ते चार हजार हेक्‍टरवर तूरीची लागवड केली आहे. सद्यस्थितीत तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून शेंगा परिपक्व होत आहेत. शेतकऱ्यांना तूर पीक फायदेशीर ठरते मात्र वातावरण बदलामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्याची गरज आहे.

आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांना शेतकरी बचत गटाचे महत्व व सेंद्रिय पद्धतीने खत निर्मिती व त्यानुसार शेती करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना स्मार्ट प्रकल्पाविषयी माहिती दिली. यासाठी शेती पूरक उद्योग उभारणीसाठी शेतकरी गटांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कृषीतज्ञ डॉ. सुधीर धकाते यांनी शेतीमध्ये वाढलेला रासायनिक खतांचा अतिवापर व त्याचे आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. उत्पादन कमी मिळाले तरी चालेल मात्र रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर वाढविण्याचे त्यांनी सांगितले.

बॉक्स

अशी करा तूर पिकासयाठी उपाययोजना

तुर पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५% किंवा अझाडिरेक्टींग ५०० पीपीएम ५० मिलि प्रति हेक्‍टर किंवा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करताना क्विनॉलफॉस २५ इसी २८ मिली इमामेक्टीन बेंजोएट पाच इजी तीन ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून शेतकऱ्यांनी फवारणी करावी. यामुळे कीड नियंत्रणात येईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.

बॉक्स

विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. कृषी विभाग व यांत्रिकी व विभागामार्फत सन २०२० २१ या आर्थिक वर्षात ट्रॅक्टर, ट्रॅक्‍टरचलित यंत्रे व औजारे,ठिबक, तुषार सिंचन, फळबाग लागवड, शेततळे, शेततळे अस्तरीकरण आदी योजनांसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी, महाआयटी या पोर्टलवर ३० डिसेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. २७ लोक ०७ के