शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वितरिकेचे बांधकाम रखडले

By admin | Updated: March 24, 2015 00:14 IST

आंतराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाच्या वितरिकेचे बांधकाम रखडल्याने तुमसर - सिवनी रस्त्याशेजारी नाल्याजवळ पाण्याचा हौद तयार झाला आहे.

तुमसर : आंतराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाच्या वितरिकेचे बांधकाम रखडल्याने तुमसर - सिवनी रस्त्याशेजारी नाल्याजवळ पाण्याचा हौद तयार झाला आहे. नाल्यापलीकडील शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीवर जावे लागते. अनेक शेतकरी शेतावर जाऊ शकत नाही. संबंधित विभागाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.बावनथडी आंतराज्यीय प्रकल्प पूर्णत्वास येवून एक वर्ष पूर्ण झाले. तुमसर, खापा, बाम्हणी, सिवनी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, कोष्टी, बोरीसह परिसरातील अनेक गावात वितरिकेचे बांधकाम अर्धवट आहे. शेत तथा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर लहान मोठे पुल संबंधित विभागाने तयार केले. पुलाखाली पाणी साचले राहते. पलीकडे शेतावर जाण्यास रस्ता नाही. कच्चे रस्ते संबंधित विभागाने उध्वस्त केले.तुमसर शहराबाहेरील शहर मोहल्ला परिसरातून सिवनी कडे रस्त्यावर बावनथडी प्रकल्प विभागाने एक सिमेंटचा पुल तयार केला. पुलाजवळ पूर्वीच मुरुमाची अवैध उत्खनन केले होते. उत्खननामुळे पुलाजवळ विहिरीसारखे मोठे खड्डे पडले होते. या खड्यात पाणी भरले आहे. खड्यापलीकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहे. या शेतावर शेतकऱ्यांना जाताच येत नाही. पूर्वी वितरिकेजवळ कच्चा पांधन रस्ता होता. या संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित प्रकल्प विभागाला तक्रारी केल् या. परंतु त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली आहे. नियोजनाच्या अभावी येथे अनेक वितरिकेची कामे रखडली आहेत. परिसरातील गावात शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. (तालुका प्रतिनिधी)मोबदला केव्हा मिळणार?तुमसर, देव्हाडी तथा परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून लहान मोठ्या वितरिका तयार करण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शासनाने मोबदला दिला नाही. चारगाव, शिवारातील काही शेतकऱ्यांना मोबदला देणे सध्या सुरु आहे. येथे काही शेतकऱ्यांना जास्त तर काही शेतकऱ्यांना अल्प मोबदला शासनातर्फे देण्यात येत आहे. या परिसरातील वितिरका नियमानुसार तयार करण्यात आल्या नाहीत. येथेही अर्धवट कामे वितरिकेची झाली आहेत. वितरिकेचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने पुढील चार ते पाच वर्षे पुन्हा शेतात पाणी सिंचनाकरिता मिळणार नाही असे चित्र आहे. शासनाने येथे वितरिकेच्या बांधकामास एकमुश्त निधी देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना तसा शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.