शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा जनआक्रोश धडकला जिल्हा कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 21:52 IST

वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि विविध प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा येथील जिल्हा कचेरीवर धडकला. या मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडर आणि डोक्यावर सरपणाची मोळी घेतलेले नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस शेतकरी, शेतमजूर संघटनेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देइंधन दरवाढीचा विरोध : मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडर आणि मोळी, प्रशासनाला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि विविध प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा येथील जिल्हा कचेरीवर धडकला. या मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडर आणि डोक्यावर सरपणाची मोळी घेतलेले नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस शेतकरी, शेतमजूर संघटनेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी केले.येथील शास्त्री चौकातील दसरा मैदानातून शेकडोच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांचा मोर्चा निघाला. विविध शहरातील विविध मार्गाने फिरत हा मोर्चा जिल्हा कचेरीवर पोहचला. या मोर्चात वाढत्या महागाईच्या विरोधात सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. महिलांनी गॅसच्या वाढत्या किमतीच्या विरोधात गॅस सिलिंडरचे हातात कटआऊट घेतले होते. तर दसरा मैदानापासून निघालेल्या या मोर्चात बैलगाडीही सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या मोर्चात लग्न झालेले प्रतिकात्मक जोडपेही सहभागी झाले होते. येथील जिल्हा कचेरीसमोर हा मोर्चा पोहचल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी शासनाच्या धोरणाविरुद्ध टीका करण्यात आली. राफेल विमान घोटाळा, इंधन दरवाढ, कर्जमाफी, बेरोजगारी आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या मोर्चात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, शहर कमेटीचे अध्यक्ष सचिन घनमारे, प्रफुल्ल गुडधे, डॉ.विनोद भोयर, मुजीब पठाण, जिया पटेल, प्रमिला कुटे, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, प्रकाश पचारे, प्रेम वनवे, रेखा वासनिक, बंडू ढेंगरे, खुशाल गिदमारे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.मोर्चाने वेधले शहरवासीयांचे लक्षकाँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा शहरातील विविध मार्गातून काढण्यात आला. या मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडरचे कटआऊट, डोक्यावर सरपणाची मोळी घेतलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. या अभिनव मोर्चाने भंडारा शहरवासीयांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे बैलगाडीमध्ये नवरी-नवरदेव प्रतिकात्मक स्वरुपात प्रवास करीत होते. त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चाने आपल्या मागण्यांसाठी मार्गावरून जाताना शासनविरोधी घोषणा दिल्या.