शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने अल्पसंख्यकांचा वापर केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 00:33 IST

अशिक्षितपणाचा फायदा घेत आजपर्यंत काँग्रेसने अल्पसंख्यंक समाजाचा वापर करून घेतला.

पत्रपरिषद : जमाल सिद्धीकी यांचा आरोपभंडारा : अशिक्षितपणाचा फायदा घेत आजपर्यंत काँग्रेसने अल्पसंख्यंक समाजाचा वापर करून घेतला. आमच्याजवळ मेहनत करणारे आणि बुद्धीवान लोक आहेत. संधीचीही कमी नाही. केवळ शिक्षणाचा अभाव असल्याने अल्पसंख्यक समाज मागे आहे. संघटनेच्या माध्यमातून अल्पसंख्यंक समाजाला मजबूत करीत शिक्षणासोबत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजबांधवापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे भाजप अल्पसंख्यंक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्यक आघाडीच्या बैठकीसाठी ते सोमवारला भंडारा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अल्पसंख्यक समाजामध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न पक्षसंघटनेच्या माध्यमातून करीत आहे. प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करणार असून यासाठी संघटनेतील एक कार्यकर्ता २० मुलांना दत्तक घेऊन हा प्रयत्न करणार आहे. मुसलमान असल्याचा ठपका ठेवून निवडणुकीत उमेदवारी नाकारली जाते, या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्यामध्ये कमतरता आहे. शिक्षित, अनुभव असणारे आणि काम करणारे लोक पुढे येत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते. पक्षाकडून प्रत्येकवेळी संधी दिली जाते, असे सांगून भविष्यात अधिकाधिक लोकांचा यात सहभाग कसा राहील? या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजना अल्पसंख्यांक बांधवापर्यंत पोहचवून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे.मौलाना आझाद महामंडळातील कर्जाची वसुली व्हावीमौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना कर्ज देण्यात आले आहे. आघाडी शासनाच्या काळात ठराविक काँग्रेस कार्यकर्त्यांना कर्ज देण्यात आले. आज या कर्जाची वसूली न झाल्याने महामंडळ तोट्यात आहे. नवीन लोकांना कर्ज न मिळण्याचे हेही महत्वाचे कारण आहे. अशा कर्ज घेऊन बुडविण्याची वृत्ती ठेवणाऱ्यांवर कारवाई करीत कर्जाची वसुली करावी व महामंडळाचे बंद कार्यालय सुरु करावे, अशी मागणी केली असून यासंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री तारिक कुरैशी, माजी सभापती कलाम शेख, अल्पसंख्यंक आघाडीचे प्रदेश सचिव आबीद सिद्धीकी, प्रदेश उपाध्यक्ष मोसीन खान, कार्यालयमंत्री मुस्ताकभाई उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)