शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादीची मुसंडी

By admin | Updated: July 7, 2015 00:35 IST

जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा शानदार ‘एंट्री’ करून सत्ता स्थापण्याकडे ...

निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रफुल्ल पटेल, सेवक वाघाये ठरले विजयाचे शिल्पकारशेतकऱ्यांसह जनसामान्यांचा रोष प्रकटलाभंडारा : जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा शानदार ‘एंट्री’ करून सत्ता स्थापण्याकडे आगेकूच केली आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्यांपैकी काँग्रेसने १९ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १५ जागांवर विजय संपादन करून भाजपवर मात केली आहे. भाजपला केवळ १३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेने खाते उघडून जिल्ह्यात अस्तित्व असल्याची जाणीव करुन दिली तर ४ अपक्षांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत अनपेक्षित हादरा बसला तर काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाले आहे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर व लाखनी पंचायत समितीत काँग्रेसने बाजी मारली असून तुमसर, साकोली, मोहाडी या पंचायत समितीवर भाजपने गड कायम राखला आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा परिषदेत १५ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही पंचायत समितीवर पूर्ण बहुमत मिळविता आले नाही. तुमसर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ८, भाजपने १ तर १ अपक्ष, मोहाडी तालुक्यात भाजपने ५ तर २ अपक्षाने बाजी मारली. भंडारा तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी ३ तर १ जागा शिवसेनेने, पवनी तालुक्यात काँग्रेसने २, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ तर अपक्षाने एक जागा जिंकली. साकोली तालुक्यात काँग्रेसने ५, भाजपने २, लाखनी तालुक्यात काँग्रेसने ५, भाजपने १, लाखांदूर तालुक्यात काँग्रेसने ५, भाजपने १ जागा बळकावली. साकोली, लाखनी, लाखांदूर व मोहाडी तालुक्यातून एकाही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळविता आले नाही. असाच प्रकार तुमसर व मोहाडी तालुक्यातून काँग्रेसला तर पवनी तालुक्यातून भाजपला खातेही उघडता आले नाही. भंडारा तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने प्रत्येकी तीन आणि शिवसेनेने एक जागा जिंकून सर्वच पक्षांना मान मिळाला आहे.साकोली पंचायत समितीत १२ पैकी भाजपने ८ जागा मिळवून बहुमत मिळविले आहे. मोहाडी पंचायत समितीत १४ पैकी भाजपला ९ जागा मिळाल्या. लाखनी पंचायत समितीत १२ पैकी ८ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. पवनी पंचायत समितीत १४ पैकी ७ जागांवर काँग्रेसने विजय संपादन केला. तुमसर पंचायत समितीत २० पैकी भाजपने ९ जागा मिळविल्या आहेत. लाखांदूर पंचायत समितीत १२ पैकी ७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. (लोकमत चमू)भाजपच्या नम्र निवेदनाला मतदारांची पाठजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने मताचा जोगवा मागण्यासाठी जनतेसमोर ‘नम्र निवेदन’ सादर केले होते. यात भाजपने मागील पाच वर्षात जिल्हा परिषदेत राबविलेल्या विविध योजनांचा पाढा लिहीला होता. सामान्य नागरिक, शेतमजुर, शेतकरी, महिला, युवा, उद्योजक या सर्वांच्या कल्याणाचा समग्र विचार करणारे सरकार म्हणजे भाजपची सरकार आहे, असे सांगून भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रचार केला. भाजपने राबविलेल्या विविध योजनांची माहिती त्यात देण्यात आली. मात्र मतदारांनी भाजपच्या या ‘नम्र निवेदन’ाला सपेशल पाठ दाखविली.बडे नेते येऊनही मतदारांनी भाजपला नाकारलेजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची तुमसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साकोलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा झाली. खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे यांनी गावागावात प्रचार केला. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार खासदार प्रफुल पटेल यांनी तर काँग्रेसचा विजय वडेट्टीवार, सेवक वाघाये यांनी किल्ला लढवून पक्षाला विजय मिळवून दिला.या कारणांमुळे मिळाला विजयसन २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट होती. हीच लाट आजही अनुभवयास आली. तेव्हा अच्छे दिनाच्या नावाखाली भाजपला कौल मिळाला होता तर यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याच मतदारांनी भाजपला रामराम केला. जिल्हा परिषदेत जातीनिहाय मतांचा फटका पक्षीय उमेदवारांना चांगलाच बसला. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याच्या स्थितीत असतानाही पक्षाने जातीय समीकरणाच्या नावाखाली त्या उमेदवाराला तिकीट नाकारल्यामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला.