शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: November 30, 2015 00:47 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर विधानसभेवर शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित व इतर बेरोजगार, महिलांवरील होत असलेल्या ...

भंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर विधानसभेवर शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित व इतर बेरोजगार, महिलांवरील होत असलेल्या अन्याय व अत्याचार, राज्याची ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, सातत्याने वाढत असलेली महागाई व इतर ज्वलंत प्रश्नावर झोपी गेलेल्या युती शासनाला जागी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. ८ डिसेंबर २०१५ ला नागपूर विधानसभेवर मोर्चाचे आयोजन केलेले आहे.या मोर्चाला यशस्वी करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिया पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक दि. २६ नोव्हेंबर ला भंडारा येथे झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी पक्षश्रेष्ठींकडून मोर्चासंबंधी प्राप्त झालेल्या सूचना व निर्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. मोर्चात उपस्थितीसाठी सर्व तालुका व शहर अध्यक्षांनी, स्थानिक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यगण, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय. व पक्षाचे सर्व सेल व विभागाचे पदाधिकाऱ्यांसोबत स्थानिक पातळीवर नियोजन करावे असे निर्देश दिले. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित व इतर बेरोजगार यांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिया पटेल यांनी कळविले आहे.या बैठकीत माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, तुमसर नगर परिषदेचे पक्षनेता प्रमोद तितीरमारे, भंडाराचे तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, पवनीचे तालुका अध्यक्ष माणिक ब्राम्हणकर, मोहाडीचे तालुका अध्यक्ष प्रभू मोहतुरे, लाखांदूरचे तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, साकोलीचे माजी तालुका अध्यक्ष मार्तंड भेंडारकर, लाखनीचे तालुका अध्यक्ष सुनील गिऱ्हेपुंजे, मोहाडीचे नगरसेवक सुनील गिऱ्हेपुंजे, भंडारा शहर अध्यक्ष सचिन घनमारे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अनिल बावनकर, संदेश शामकुवर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)