शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मालकी पट्ट्यासाठी संघर्ष

By admin | Updated: September 6, 2014 23:32 IST

सन १९६० च्या सुमारास वैनगंगा नदीकाठावरून जुना ढिवरवाडा गावाला वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात आले. मात्र अजुनही गावकऱ्यांकडे घर बांधलेल्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे नाहीत.

प्रकरण थंडबस्त्यात : व्यथा पुनर्वसित ढिवरवाडा गावाची युवराज गोमासे ल्ल करडी/पालोराभंडारा : सन १९६० च्या सुमारास वैनगंगा नदीकाठावरून जुना ढिवरवाडा गावाला वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात आले. मात्र अजुनही गावकऱ्यांकडे घर बांधलेल्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे नाहीत. गत ५४ वर्षांपासून ग्रामवासियांचा संघर्ष सुरू असला तरी आजही न्याय मिळालेला नाही. शासन प्रशासन दरबारी प्रकरण थंडबस्त्यात आहे.मोहाडी व भंडारा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर नव्यानेच निर्माण झालेल्या कोका वन्यजीव अभयारण्या शेजारी पुनर्वसित ढिवरवाडा गावाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. सन १९६० च्या सुमारास वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या जुना ढिवरवाडा गावाला वारंवार पुराचे चटके बसत होते. पुरामुळे गावाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. चोहोबाजुने गावाला पुराने वेढा घातला जायचा. गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होत असताना जिवितहानीचा सामनाही करावा लागत होता. पुरापासून बचाव करण्यासाठी शासन प्रशासन स्तरावरून बऱ्याचदा प्रयत्न झाले. अखेर सन १९६० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशान्वये जुना ढिवरवाडा गावाला वनविभागाचे जागेत पुनर्वसित करण्यात आले. त्याला ५४ वर्षाचा काळ लोटत आहे. निस्सार पत्रकानुसार वनविभागाच्या १६२ गटातील जागेत गावाचे पुनर्वसन करण्यात आले. जंगलातील झाडांची कटाई करून गावाला जमिन उपलब्ध करून देण्यात आली.गावाच्या सोयीसुविधांसाठी सार्वजनिक तरतुदीनुसार स्मशानभूमी, ढोरफोडी, आखर, गुरे चराईसाठी जागा मिळावी यासाठी ढिवरवाडावासियांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र वनविभाग व महसूल विभागाच्या वादात प्रकरणी न्याय मिळालेला नाही. गावातील नागरिकांना घरांसाठी जागेचे वाटप करण्यात आले. मात्र मालकी हक्काचे पट्टे अजुनही वाटप झालेले नाहीत. गाव मालकी हक्कांपासून वंचित आहे. मालकी हक्काची लढाई आजही सुरू आहे.