शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द जलस्तराचा दुसरा टप्पा पूर्ण

By admin | Updated: November 18, 2016 00:36 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या व महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम सुरु असून धरणामध्ये

जलस्तर २४२.१०० मीटर : यावर्षी २४२.५०० मीटरचे उद्दिष्टपवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या व महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम सुरु असून धरणामध्ये दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे २४२ मिटर पर्यंतचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे. आज धरणाचा जलस्तर २४२.१०० मिटर वर पोहचला आहे. या वर्षी धरणामध्ये २४२.५०० मिटर पर्यंत जलस्तर वाढविण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. जलस्तर वाढविल्यामुळे नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वीत होण्याला मदत होणार आहे. डाव्या कालव्याने सिंचन करायला मदत होणार आहे.मागच्या वर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४२ मिटर पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्य होते. पण जलस्तर वाढविल्यामुळे अनेक गावात पाणी शिरल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे नवीन गावठानात स्थानांतरण करायला अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मागच्या वर्षी सरकारने २४.८०० मिटर वर जलस्तर वाढविण्याचे काम थांबविले होते. पण जलस्तर वाढविण्याचे काम थांबविल्यामुळे राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या या धरणाला केंद्र सरकारकडून निधी मिळायला अडचणी येत होत्या. बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ मिळाल्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे बुडीत क्षेत्राीतल गावे रिकामे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुनर्वसन कार्यक्रमाला गती आली. बुडीत क्षेत्रातील एक एक गाव रिकामे होऊ लागले व बुडीत क्षेत्रातील दुसऱ्या टप्प्यातील बहुतेक गावांनी नवीन गावठानात स्थानांतरण केले. त्यामुळे गोसेखुर्दचा जलस्तर वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला.भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील वडद, अर्जुनी, पिपरी, जाख, बोरगाव (बु.), मौदी, महालगाव, पाथरी, सावरगाव आदी गावे नवीन गावठानात स्थानांतरीत झाले आहेत. चिचखेडा गावातील ७५ टक्के प्रकल्पग्रस्त नवीन गावठानात गेले आहे. या गावाला कोणताही धोका नाही. नागपूर जिल्ह्यातील मालोदा, गडपायली, उमरी, बोरीनाईक, मरुपार, पांजरेपार, सोनारखारी, थुटानबोरी, खराडा, सावंगी, गोठनगाव, तुडका, सालेशहरी, सालेभट्टी, तुडका आदी गावे स्थलांगतरीत झाले आहेत. त्यामुळे जलस्तर वाढविण्याला कोणतीही अडचण नव्हती.यावर्षी आॅक्टोबर पासून गोसीखुर्दचा जलस्तर २४१.८०० मिटर पासून वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले. महिन्याच्या शेवटी दुसऱ्या टप्प्यातील २४२ मिटर वाढविण्याचे काम पूर्ण झाले. दिवाळी समोर असल्यामुळे जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते .मागील दोन दिवसापासून परत जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यातील जलस्तर आज २४२.१०० मिटरवर पोहचला आहे .यावर्षी जलस्तर २४२.५०० मिटर करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. (तालुका प्रतिनिधी)