शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

नगराध्यक्षांसह चार जणांविरुद्ध पोलिसात तक्रार

By admin | Updated: August 5, 2014 23:19 IST

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व माजी नगरसेवकांनी महिलांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार सात

भंडारा : नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व माजी नगरसेवकांनी महिलांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार सात महिला सदस्यांनी भंडारा पोलिसात केली आहे. ही माहिती सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत तक्रारकर्त्या महिलांनी दिली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी संबधित तक्रारीवर कारवाई सुरु असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष बाबूराव बागडे, महेंद्र गडकरी, मकसुद बंसी व भगवान बावनकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणामुळे भंडाऱ्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पत्रपरिषदेला संध्या धनगर, आशा गायधने, ज्योती गणवीर, करुणा घोडमारे, शमीमा शेख, आशा उईके, चेतना हेडाऊ, धनराज साठवणे, विकास मदनकर आदी सदस्य उपस्थित होते. आशा गायधने म्हणाल्या, विशेष सभेत पालिका सदस्यासह एका माजी नगरसेवकाने महिला नगरसेवकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केली. यात करुणा घोडमारे यांच्या हाताला व पाठीला मार बसला. ज्योती गणवीर, संध्या धनकर यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, असेही गायधने यांनी सांगितले. सभा सुरु होताच साठवणे गटातील महिला सदस्य या नगरसेविका किरण व्यवहारे, गीता सतदेवे यांच्याशी चर्चा करायला जात असताना बाबूराव बागडे, महेंद्र गडकरी, मकसुद बंसी व भगवान बावनकर यांनी महिला नगरसेवकांना धक्काबुक्की केली यात संध्या धनकर, करुणा घोडमारे व ज्योती गणवीर यांना दुखापत झाली. निवडणूक प्रक्रियेत आमची हजेरी म्हणून स्वाक्षरी घेण्यात आली नाही. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे. महिलांसोबत असभ्य वर्तणूक करणाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही महिला नगरसेवकांनी केली. भगवान बावनकर नगरसेवक नसतानाही त्यांना आत प्रवेश कसा देण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. रात्री उशिरापर्यंत भंडारा पोलिस ठाण्यात कारवाई सुरु होती. भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांनी याबाबत दुजोरा दिला. (प्रतिनिधी)