शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री मित्र योजना

By admin | Updated: May 17, 2016 00:16 IST

सर्वसामान्यांचा समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री मित्र ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.

पत्रपरिषद : भाजप प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांची माहितीभंडारा : सर्वसामान्यांचा समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री मित्र ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून १५ नागरिकांची मुख्यमंत्री मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपच्या प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी त्या म्हणाल्या, भाजपच्या ध्येयधोरणानुसार प्रत्येक योजनांचा लाभ अखेरच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे. या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेला नेहमी प्रत्येक बाबतीत काहीना काही अडचणींना तोंड द्यावे लागते. अशावेळी त्यांच्या समस्यांमध्ये वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री मित्र दुवा ठरणार आहे. नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी ही योजना आहे. जिल्हानिहाय १५ व्यक्तींची मुख्यमंत्री मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. राज्यातून यासाठी २,८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री मित्रमध्ये युवक, माजी सरकारी अघिकारी, माजी सैैनिक, निवृत्त पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, वकील आदींचा समावेश असेल. तहसील कार्यालय, शासकीय रूग्णालय, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आदी शासकीय कार्यालयांमार्फतच्या योजना, जनतेची दैनंदिन कामे योग्य पध्दतीने चालतात का याचा आढावा हे मुख्यमंत्री मित्र वेळोवेळी घेतील. सर्व शासकीय कार्यालयांचे सोशल आॅडिट होईल, असेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला आमदार चरण वाघमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, माजी खासदार शिशुपाल पटले, प्रकाश मालगावे, नितीन दुरगकर, आशु गोंडाणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)