शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

झरी उपसा सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाकडून प्राधान्य मिळत असले तरी १८ वर्षांपासून झरी उपसा प्रकल्प राजकीय उदासीनतेचा बळी ठरला होता. या ...

सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाकडून प्राधान्य मिळत असले तरी १८ वर्षांपासून झरी उपसा प्रकल्प राजकीय उदासीनतेचा बळी ठरला होता. या अपूर्ण प्रकल्पामुळे लाखांदूर तालुक्यातील सुमारे अडीच हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित होती. झरी (मुर्झा) हे गाव डोंगराळ भागात असून, विस्तीर्ण वनराईत आहे. इटियाडोह धरणाचा अर्जुनी मोरगाव येथील मुख्य कालवा झरी तलावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. धरणात झरी उपसा सिंचन योजना प्रकल्पासाठी हक्काचे १२.९४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. या दरम्यान कालवा तयार केल्यास ३५ दुष्काळी गावातील २ हजार १९५ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येऊन सुमारे १ लक्ष लोकांना सिंचनाचा लाभ मिळू शकतो.

२२ एप्रिल २०१० च्या परिपत्रकानुसार या प्रकल्पाला २५ कोटी व त्यापेक्षा अधिक किमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ‘झरी उपसा सिंचन योजना प्रकल्प’ असे नामकरण करण्यात आले होते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अंतर्गत इटियाडोह प्रकल्पाच्या नियोजनातून १२.९४ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा सिंचन योजनेकरिता उपलब्ध करून देण्याची मान्यता शासनाने दिली असल्याचे पत्र तत्कालीन शासनाचे उपसचिव प्र. ना. घोडके यांनी कार्यकारी संचालकांना दिले होते. ३० जून २०१२ रोजी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ प्रधान सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई यांना झरी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता टप्पा १ च्या कामाचा प्रस्ताव मान्यतेकरिता सादर केले होते. मात्र, मध्येच माशी शिंकली आणि पुन्हा हा प्रकल्प अडगळीत पडला. दरम्यान, ३० जानेवारी २०२१ रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता लाखांदूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बालू चुन्ने यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करून झरी तलाव प्रकरण मार्गी लावण्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर मंत्री पाटील यांनी निवेदनकर्त्यांना प्रकल्पाचे दस्तऐवज घेऊन मुंबई मंत्रालयात पाचारण केले होते. या चर्चेअंती इटियाडोह धरणाच्या अर्जुनी/मोरगाव येथील मुख्य कालव्यापासून झरी तलावापर्यंत पाच किलोमीटर अंतराचा कालवा बनवून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासंबंधी पत्र जिल्हाधिकारी कार्यालय भंडारामार्फत कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना सादर करून झरी उपसा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे आता १८ वर्षांपासून वनवासात असलेल्या या प्रकल्पाला गती मिळणार असून, ३५ गावांतील शेती सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.