शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

गटशिक्षणाधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास!

By admin | Updated: January 24, 2015 22:50 IST

जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी कॉन्व्हेंटच्या तुलनेत गुणवत्तेत कमी ठरतात. जिल्हा परिषद शाळा व खाजगी कॉन्व्हेंट यांच्यातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात तफावत आहे. जिल्हा परिषद

भुयार : जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी कॉन्व्हेंटच्या तुलनेत गुणवत्तेत कमी ठरतात. जिल्हा परिषद शाळा व खाजगी कॉन्व्हेंट यांच्यातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात तफावत आहे. जिल्हा परिषद शाळामधील शिक्षण कॉन्व्हेंटच्या शिक्षणापेक्षा कमकुवत आहे, असा आरोप नेहमी पालक करतांना दिसतात.जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीही हुशार व गुणवत्तेत उतरावा यासाठी पंचायत समिती पवनीचे गटशिक्षणाधिकारी शामकर्ण तिडके यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेला भेटी दिल्या. वर्गनिहाय विद्यार्थ्यांना लेखन, वाचन व बौध्दीक प्रश्न करुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. हजेरी क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना बोलावून शैक्षणिक प्रगती किती झाली व त्यासाठी समोर काय करावे लागणार यासंबंधी शिक्षकांशी चर्चा करुन ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी आहे, त्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष देण्याच्या सुचना देण्याचे कार्य करीत आहे. तर जे विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत, त्यांच्या ज्ञानात आणखी कशी भर पडेल यासंबंधी शिक्षकांशी हितगुज करतात. गटशिक्षणाधिकारी यांच्या उपक्रमाचे पालक वर्गात स्वागत केल्या जात असून त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.(वार्ताहर)