शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कुकडे यांची राकाँकडून दावेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:24 IST

१५ वर्षे भाजपचे आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्यानंतर आता ते २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दावेदारी केली आहे.

ठळक मुद्देमोर्चेबांधणीला वेग : विजय शिवणकर, सुनील फुंडे यांची नावे चर्चेत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १५ वर्षे भाजपचे आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्यानंतर आता ते २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दावेदारी केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अद्याप आघाडी झालेली नसली तरी या जागेवर आमचाच हक्क असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. परंतु याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कुठल्याही सूचना कार्यकर्त्यांना आलेल्या नसल्यामुळे संभ्रम कायम आहे.मधुकर कुकडे हे राष्ट्रवादीचे भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणून चार वर्षांपासून कार्यरत आहेत. या चार वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी गावागावात बुथ कमिटी स्थापन करण्यापासून कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचे काम केले. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाविरूध्द आंदोलने, मोर्चे आणि निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांना एकसंघ केले. आजही ते जिल्हा कार्यालयात बैठका घेऊन आणि जिथे गरज आहे तिथे स्वत: जावून जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अग्रेसर राहतात. २०१४ ची निवडणूक राष्ट्रवादीने लढली होती. या निवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली असली तरी ही पोटनिवडणूक आपणच लढवावी, असा सूर राष्ट्रवादीत आहे. समजा ही पोटनिवडणूक काँग्रेसच्या वाट्याला गेली आणि काँग्रेस निवडून आली तर २०१९ मध्ये दावा सोडणार नाही? असा प्रश्न करून राष्ट्रवादीच ही जागा लढवून जिंकणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना आहे.याशिवाय भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांच्यासह गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नावाचीही राष्ट्रवादीकडून चर्चा सुरू आहे. तरीसुद्धा कोणत्या पक्षाची कुणाला उमेदवारी कुणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.पोटनिवडणूक लढण्याची आपली ईच्छा आहे. उमेदवारी मिळाल्यास ही पोटनिवडणूक नक्की लढणार. परंतु उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी खासदार प्रफुल्लभाई पटेल हे जो निर्णय घेतील तो निर्णय माझ्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मान्य राहील.- मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा.