शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहर ठरतेय कोरोना हाॅटस्पाॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून, सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. जणू भंडारा शहर कोरोना ...

भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून, सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. जणू भंडारा शहर कोरोना हाॅटस्पाॅट ठरू पाहत आहे. लगतच्या ग्रामपंचायतीतही रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

भंडारा तालुक्यात आतापर्यंत ७ हजार ३६१ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे भंडारा शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतींमधील आहेत. गत तीन दिवसांपासून तर भंडारा तालुक्यात विक्रमी रुग्णांची संख्या वाढत आहे. ३१ मार्चरोजी २८१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्या होत्या, तर गुरुवारी ३२० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव रुग्णही भंडारा तालुक्यात १४४७ आहेत.

शहरातील विविध भागांत कोरोना रुग्ण आढळून येत असून, लगतच्या ग्रामपंचायतीही त्यात भर घालत आहेत. गणेशपूर, भोजापूर, बेला, कारधा या गावांतही रुग्णांची संख्या आता वाढायला लागली आहे. भंडारा शहरात काही भागात प्रशासनाने कंटेनमेंट झोन लावले आहे. एमएसईबी काॅलनीत गुरुवारी रुग्ण आढळल्याने गणपती मंदिर परिसरात कंटेनमेंट झोन लाऊन प्रशासनाने हा परिसर प्रतिबंधित केला आहे. कोरोना रुग्ण वाढण्यामागील कारण म्हणजे शहरात नियमांचे होणारे सर्रास उल्लंघन होय. गत सात दिवसांपासून रुग्णसंख्या वेगाने वाढत असली, तरी नागरिक मात्र बिनधास्तपणे फिरत आहेत.