शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

नागरिकांनी कायदा, सुव्यवस्था राखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:09 IST

सण कोणताही असो शांतता व सद्भावना जोपासल्या गेली पाहिजे. चांगला हेतू ठेवून गणेशोत्सवाची सुरूवात करा.

ठळक मुद्देविनिता साहू : उपविभागीय स्तरावरील बैठकीत आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : सण कोणताही असो शांतता व सद्भावना जोपासल्या गेली पाहिजे. चांगला हेतू ठेवून गणेशोत्सवाची सुरूवात करा. गावाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. गणेशोत्सव असो की बकरी ईद साजरे करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. सण आनंदाने व उत्साहाने साजरे करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.पोलीस उपविभाग पवनीच्या वतीने गांधी भवनात आयोजित उपविभागीय स्तरावरील जातीय सलोखा व शांतता बैठकीचे अध्यक्षीय मार्गदर्शनात त्या पुढे म्हणाल्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाचे निर्देश पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. गणेश मंडळांनी डी.जे. चा आवाज ५० डेसीबल पेक्षा अधिक वाढू देऊ नये, कायद्याचे उल्लंघन केल्यास नाईलाजास्तव डी.जे. मालक व मंडळ पदाधिकारी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येतील. होतकरू युवकांवर गुन्हा दाखल असणे त्यांचे भविष्यासाठी हानीकारक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मिरवणुकीत दारू सेवन करून नाचणाºया विरूद्ध गुन्हा दाखल होवू शकतो त्यामुळे दारूचा अवैध पुरवठा होणार नाही याची काळजी सर्व ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी घ्यावी. मंडळांनी स्वच्छता, वृक्ष लागवड, आरोग्य विषयक शिबिर व समाज प्रबोधन कार्यक्रम यावर भर देवून गणेशोत्सव व ईद शांततेच्या मार्गाने साजरी करावी, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.बैठकीचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांनी प्रास्ताविकात बैठक आयोजनाची भूमिका स्पष्ट करून नागरिकांनी सर्वधर्म समभाव बाळगुण गणेशोत्सव व बकरी ईद साजरे करावे, अशी सद्भावना व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी तहसिलदार गजानन कोकड्डे यांनी मार्गदर्शन केले. गणेश उत्सव, मिरवणुकी दरम्यान उद्भवणारे वाद, पुरस्कारा संदर्भात घेतल्या जाणारे निर्णय, ईको फ्रेंडली गणेशमुर्ती, मूर्ती विसर्जनाचे स्थळ या विविध विषयावर न.प. चे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, मच्छी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष प्र्रकाश पचारे, प्रियदर्शनी गणेश मंडळ पवनीचे प्रतिनिधी रविंद्र रायपुरकर, सुरेश अवसरे, न.प. सदस्य शोभना गौरशेट्टीवार, पोलीस पाटल रूपचंद मेश्राम, दिलीप कांबळे यांनी बैठकीत मुद्दे उपस्थित केले. यासंदर्भात बैठकीच्या प्रमुख मार्गदर्शक जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहु यांनी मार्गदर्शन करून प्रश्न कर्त्यांचे समाधान केले.बैठकीला पवनी, अड्याळ, लाखांदूर व दिघोरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, गणेश उत्सव मंडळ प्रतिनिधी तंटामुक्त समिती पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पवनीचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने, अड्याळचे सहा. पोलीस निरीक्षक वाय.एस. किचक, लाखांदुरचे पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यु. मंडलवार, दिघोरीचे सहा. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखडे, गोपनीय विभाग प्रमुख व्ही.बी. गजभिये उपस्थित होते. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभाकर तिक्क्स, संचालन अशोक पारधी तर आभार पोलीस निरीक्षक सुनिल ताजणे यांनी केले.