शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा सरपंचांसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:32 IST

राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा मान मिळाला.

ठळक मुद्देव्हिडीओ कॉन्फरन्स : १६ पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा मान मिळाला.ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात कोटी २५ लाख ३६ हजार रुपये खर्चाच्या १६ पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ई-भूमिपूजन करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील करडी व तुमसर तालुक्यातील येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनास पाणीपुरवठा मंत्र्यांनी मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एम.बी. मैदमवार, माजी सभापती नरेश डहारे आणि विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हीडीओ कॉन्फरन्सीच्याद्वारे मुख्यमंत्र्यांनी कांद्री येथील सरपंचासोबत थेट संपर्क साधला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांनी कांद्री हे गाव आयएसओ असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. कांद्री गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. या योजनेमुळे गावकऱ्यांना पाणी मिळणार असून हे आपल्यामुळेच घडणार असल्याचे शालूताई मडावी यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासह गावकºयांचे अभिनंदन केले.खासदारांनी केली आरओ प्लांटची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधताना खासदार मधुकर कुकडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आरो प्लांटची मागणी केली. भंडारा शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आरओ प्लांट देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालयांना शुद्ध पाणी पुरवठा व आरओ प्लांटबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.