चढाओढ सुरू : खुला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपदभंडारा : पूर्व विदर्भातील नऊ नगर पालिकांमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून भंडारा पालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक दि. ५ आॅगस्ट रोजी आहे. विद्यमान नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ ६ आॅगस्ट रोजी संपत आहे. पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष व उपाध्यक्षपाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे नजरा लागल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणुकीत अध्यक्षपद आरक्षणांतर्गत खुला असा आहे. निवडणुकीसाठी पालिका सभागृहात दि. ५ रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष सभा होईल. उपविभागीय अधिकारी रविंद्र कुंभारे हे पिठासीन अधिकारी म्हणून राहतील. अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दि. १ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी व पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची यादी त्याच दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात येणार आहे. याचवेळी इच्छूक असलेले उमेदवार अपीलसुद्धा करू शकतील. दि. ४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ वाजतापर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेऊ श्कतील.दि. ५ रोजी सभा सुरु झाल्यावर पिठासीन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची व उमेदवारी मागे घेतलेल्यांची नावे वाचून दाखवतील. त्यानंतर मतदानाला प्रारंभ होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी दोन गटात रस्सीखेच असून राजकीय वातावरण तापलेले आहे. सध्या नगरपालिकेसह शहरात आगामी निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. (प्रतिनिधी)
नगराध्यक्षांची निवडणूक ५ रोजी
By admin | Updated: July 29, 2014 23:38 IST