शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

खांबतलाव चौकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: January 28, 2015 23:09 IST

नगर पालिकेकडून मागील आठवडाभरापासून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहिम बुधवारी खांबतलाव चौकात पोहोचली. जेसीबीच्या सहाय्याने येथील अतिक्रमण पुर्णपणे साफ करण्यात आले.

भंडारा: नगर पालिकेकडून मागील आठवडाभरापासून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहिम बुधवारी खांबतलाव चौकात पोहोचली. जेसीबीच्या सहाय्याने येथील अतिक्रमण पुर्णपणे साफ करण्यात आले. आता हा चौक मोकळा श्वास घेऊ लागला आहे.अतिक्र मणामुळे शहराची अवस्था बकाल झाली आहे. वाढत्या अतिक्र मणामुळे नागरिकांना रस्त्याने धड चालतासुद्धा येत नव्हते. त्यामुळे नगर पालिकेने मागील आठवडाभरापासून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली. या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गांधी चौक, पोष्ट आॅफीस चौक व अन्य भागातील अतिक्र मण काढल्यानंतर बुधवारी अतिक्र मण निर्मुलन पथक गजबजलेल्या खांबतलाव चौकात पोहोचले. या चौकाच्या सभोवताल असलेले अतिक्र मण पूर्णपणे काढण्यात आले.खांबतलाव चौक हा गजबजलेला परिसर असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते. निमुळता रस्ता असल्यामुळे याठिकाणी यापुर्वी अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या चौकाचे विस्तारीकरण होणे आवश्यक आहे. बुधवारी अतिक्र मण निर्मुलन पथकाने या चौकातील अतिक्र मण काढल्याने हा चौक मोकळा झाला आहे. आता याठिकाणी पुन्हा अतिक्र मण होऊ नये, याची खबरदारी पालिकेने घ्यावी, असा आशावाद नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. मोहिमेच्या प्रारंभापासूनच शहरवासीयांनी पालिकेला सहकार्य केल्याचे दिसून आले. बहुतांश नागरिकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढून पालिकेला सहकार्य केले असल्याचे दिसले.ही कारवाई पालिकेचे अतिक्र मण निर्मुलन पथकाचे प्रमुख आनंद मिश्रा यांच्या नेतृत्वात किशोर उपरीकर, पवन मोगरे, मुनीश मोगरे, दिनेश भवसागर यांनी पार पाडली. (नगर प्रतिनिधी)