शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाचा कारभार प्रभारावर

By admin | Updated: August 8, 2015 00:45 IST

११ हजार हेक्टर आर शेतीला सिंचनाखाली आणणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या नहराची स्थिती वाईट झाली असताना,...

पाणी वाटप प्रभावित होणारदोन्ही शाखा अभियंतांचे स्थानांतरणरंजित चिंचखेडे  चुल्हाड११ हजार हेक्टर आर शेतीला सिंचनाखाली आणणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या नहराची स्थिती वाईट झाली असताना, नियंत्रण ठेवणारा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंते प्रभारी आहेत. यामुळे सिहोरा परिसरात असंतोष खदखदत आहे.मध्यम प्रकल्प चांदपुर जलाशयाच्या अखत्यारित पाणी वाटप व नियंत्रण ठेवण्यासाठी सिहोरा गावात पाटबंधारे विभाग कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाची स्वतंत्र प्रशासकीय इमारत बांधकाम आहे. याशिवाय विभागात डावा आणि उजवा अशी कालवा अंतर्गत विभागणी करण्यात आलेली आहे. उजवा कालवा ३,९६९ हेक्टर आणि डावा कालवा ३,०६८ हेक्टर आर शेती सिंचनाखाली आणण्यात येत आहे. निर्धारित ओलीताखाली आणणारा शेतीचा आकडा ११ हजार हेक्टर आर पर्यंत गेला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पुर्णत्वास गेल्याने सिहोरा परिसरात शेती सिंचनाखाली आणणारा आकडा १४ हजार हेक्टर आर निश्चित करण्यात आलेला आहे. परंतु पाणी वाटप आणि नियंत्रण ठेवणारा पाटबंधारे विभागात रिक्त पदांचा अनुशेष कार्यरत कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. या विभागात यापुर्वी २ शाखा अभियंता व त्यांच्या दिमतीला ५० कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा होता. यावेळी या कर्मचाऱ्यांवर ७ हजार हेक्टर ३७ आर शेती सिंचनाखाली आणण्याची जबाबदारी होती. डावा आणि उजवा कालवा असे स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. आजघडीला या दोन्ही विभागावर ११ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्याची जबाबदारी असून केवळ १६ कर्मचारी कार्यरत आहे. पाणी वाटप आणि पाणी पट्टी करांची वसुली करताना या कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत आहे. प्रशासकीय कामे या कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर ठेवण्यात आली आहेत. यामुळे एक ना धड, भाराभर चिंध्या अशी अवस्था या विभागाची झाली आहे.दरम्यान, डावा कालवा अंतर्गत शेतीला पाणी वाटपाची जबाबदारी शाखा अभियंता घोलपे आणि उजवा कालवा पप्पुलवार यांना देण्यात आली होती. दोन्ही कालव्याअंतर्गत स्वतंत्र शाखा अभियंता कार्यरत असताना घोलपे यांचे स्थानांतरण अन्य जिल्ह्यात झाले असल्याने वर्षभरापुर्वी रिक्त प्रभार शाखा अभियंता पप्पुलवार यांना देण्यात आलेला आहे. परंतु नुकतेच दोन्ही कालव्याचा प्रशाकीय कारभार सांभाळणारे शाखा अभियंता पप्पुलवार यांना पदोन्नती देण्यात आले असून आॅगस्ट अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. जनतेच्या समस्यावर आंदोलनासाठी चर्चेत असणाऱ्या या परिसरात शासन गंभीर नसल्याची बाब दिसून येत आहे. परिसरात कालवे आणि नहरांनी पाणी वाटप करताना कार्यरत कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. नहरांची अवस्था जिर्ण झाली असून केरकचऱ्यांनी तुंबली आहेत. यामुळे थेट शेतात पाणी पोहचत नाही. याशिवाय पाणी वाटपात नहर जागोजागी फुटत आहेत. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. कालवे आणि नहरांचा कायापालट करण्यासाठी ६० कोटींचा अनुशेष आहे. शासनाने तात्काळ रिक्त पदे भरून नहरांचा विकास करण्याची मागणी शेतकरी यांनी केली आहे.