शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

By admin | Updated: October 28, 2016 00:26 IST

शेती हा प्रमुख व्यवसाय असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे.

तुमसर : शेती हा प्रमुख व्यवसाय असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे. तुमसर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी पद मागील एका वर्षापासून रिक्त असून प्रभारींच्या खांद्यावर सध्या कारभार सुरु आहे. राज्य शासनाची यास अनास्था म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.तुमसर शहर व ९७ ग्रामपंचायतीचा समावेश तुमसर तालुक्यात होतो. भंडारा जिल्ह्यात क्रमांक दोनचा तुमसर तालुका आहे. धानाचे कोठार म्हणून तुमसर तालुक्याची राज्यात ओळख आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय येथे आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता कृषी कार्यालय येथे आहे. परंतु मागील एका वर्षापासून तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे.तालुक्यातील ३५ ते ४० कि.मी. अंतरावरून शेतकरी तथा लोकप्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात मार्गदर्शनाकरिता येतात. तेव्हा त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट होत नाही. रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.आठवड्यातून दोन ते तीन दिवस ते तुमसर येथे उपस्थित राहतात, तर उर्वरीत दिवस ते गोरेगाव येथे कृषी कार्यालयात बसतात. गोरेगाव जि. गोंदिया येथे त्यांची पदस्थापना आहे. गोरेगाव ते तुमसर सुमारे ७५ कि.मी. त्यांना प्रवास करावा लागतो.भंडारा व गोंदिया येथे जिल्हास्तरीय बैठकांना त्यांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे कार्यालयात त्यांची उपस्थिती कमी असते. तुमसर येथील कृषी कार्यालयात मोठा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. परंतु प्रमुख अधिकारी उपस्थित राहू शकत नसल्याने कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. राज्य शासनाच्या अनेक कृषीच्या योजना आहेत .उपक्रम राबविणाऱ्या प्रमुख तालुका पातळीच्या अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी अधिकारी का मिळत नाही हा संशोधनाचा विषय आहे.यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी राज्याचे कृषीमंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)